कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे - स्वप्नील निखाडे


कोपरगांव प्रतिनिधी

संपुर्ण विश्वाला ज्या महामारीने व्यापले आहे, प्रगतशील देशातील जीवन ज्या मुळे कोडमडले आहे, त्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासन देखील रात्र दिवस काम करत आहे. परंतु या वैश्विक महामारी बरोबर दोन हात करण्यासाठी प्रषासनाच्या खांद्याला खांद्या लावुन काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कोपरगांव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. स्वप्नील निखाडे यांनी केले आहे.


देशासह, राज्यात देखील कोरोनाचे मोठे संकट आले आहे. आज प्रत्येक व्यक्ती गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. कोपरगांव शहर व ग्रामीण भागात ही रुग्ण संख्या वाढत असुन हे संकट आजच्या परिस्थितीत जीवघेणे ठरत आहे. या संकटाचा सामना करता करता अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोपरगांव मध्ये आजही रूग्णांसाठी आॅक्सीजन बेड आणि औषधांचा तुटवडा मोठया प्रमाणात भासत असल्याने रुग्णांचे नातेवाईकांची धावपळ होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी देखील संकट काळात सर्वांनी एकत्र येण्याचे आवहन देखील केले आहे तसेच संजीवनी उद्योग समुह व संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातुन रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. या संकटसमयी लोकप्रतिनिधीसह सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्था, धार्मीक संस्था, धर्मदाय संस्था, तरुण मंडळे आदि संस्थांनी देखील एकत्र येवुन स्थानिक पातळीवर उपाययोजना आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.  कोरोनाची आलेली ही दुसरी लाट अतिशय भयंकर असुन दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. त्यात जाणवणारा औषधांचा तुटवडा व मोठया प्रमाणात भासणारी  आॅक्सीजनची कमतरता या चिंतेत आणखी भर पडली आहे. यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सामुहीक प्रयत्न करण्यासाठी एकत्र येवुन काम करण्याची गरज असल्याचे मत श्री. निखाडे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा