ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


अहमदनगर:
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.


शुक्रवार दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह, श्रीरामपूर. दुपारी 12 वाजता श्रीरामपूर येथून मोटारीने नेवासाकडे प्रयाण. दुपारी 12.45 ते 1.45 वाजता नेवासा तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- पंचायत समिती सभागृह, नेवासा. दुपारी 1.45 वाजता नेवासा येथून अहमदनगरकडे प्रयाण . दुपारी 2.45 ते 4 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे राखीव. दुपारी 4 ते 5 वाजता अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 5 ते 5.45 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.



शनिवार, दिनांक 1 मे 2021 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 8 वाजता 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सकाळी 8.15 वाजता ग्रामविकास विभागाकडून 14 व्या वित्त आयोग निधीतून 45 रग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी हस्तांतरण. सकाळी 8.30 ते 10 शासकीय मोटारीने अहमदनगर येथून शिर्डी विमानतळ, काकडीकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"