राजेश यशवंत कुलकर्णी यांचे चिरंजीव व संवत्सर गावचे भूषण वरद कुलकर्णी हा डॉक्टर झाला........
तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले राजेश यशवंत कुलकर्णी यांचे चिरंजीव व संवत्सर गावचे भूषण वरद कुलकर्णी हा डॉक्टर झाला आहे. तो एम. बी. बी. एस परीक्षेत कोल्हापूरच्या राजषश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गुणवत्तेत पहिल्या दहामध्ये 68. 77% गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
चिरंजीव वरद, याचे वडील राजेश यशवंत कुलकर्णी यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. मुलाला त्याची जानिव करून दिली. वरद कुलकर्णी यास इयत्ता दहावी मध्ये 89 तर बारावी मध्ये 92% , सिईटी मध्ये 200 पैकी 181 गुण मिळाले होते. त्या गुणानुक्रमाच्या आधारावर एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी त्याला कोल्हापूर येथे प्रवेश मिळाला होता. त्याने चीज करून दाखवले. वरद कुलकर्णी यास डॉ. बनसोडे, डॉ. हिरगूडे यांच्यासह अन्य गुरुजनांचे मार्गदर्शन मिळाले. वरद कुलकर्णी आता 2022 मध्ये होणाऱ्या पीजी परीक्षेची तयारी करत असून त्याला निष्णात सर्जन व्हायचे आहे. त्याची आतेबहीण भाग्यश्री किशोर कुलकर्णी ही देखील फार्मसीमध्ये एम. एस. झाली असून भारतातील नामांकित दहा शिक्षण संस्थापैकी अहमदाबाद येथे तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे व सध्या ती सन फार्मा मध्ये संशोधक म्हणून काम करत आहे, हे दोघेही संवत्सर गावचे भूषण आहे.
Comments
Post a Comment