संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता जिल्ह्यासाठी मास्टर प्लान तयार........
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बधाचे पालन करा पुढील १५ दिवस पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन औषध आणि दूध वितरण वगळता इतर बाबींवर निर्बंधाची आवश्यकता अहमदनगर : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली. मात्र , अद्यापही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण , नागरिकांचे आरोग्य सर्वांत महत्वाचे असून ते जपणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढील तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी आणि या दोन कोरोना लाटांचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातकोरोना प्रतिबंधात्मक उपा