कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आणि रुग्णालयातील बेड्स उपलब्धतेवर आता जिल्हा प्रशासनाची नजर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नियुक्त केले तीन नोडल अधिकारी

अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना केल्या असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) अजित थोरबोले, बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन आणि ह़ॉटस्पॉट बाबत समन्वय साधून जबाबदारी पार पाडण्याकरिता उपजिल्हाधिकारी (रोहयो)  उदय किसवे आणि जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीएचसी) आणि डीसीएच मधील रुग्णांसाठीच्या खाटांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 

कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) अजित थोरबोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना साहाय्य करण्यासाठी सहायक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वसंतराव जमदाडे, तहसीलदार (पुनर्वसन) आर. बी. वारुळे, अव्वल कारकून (भूसंपादन) शुभांगी बेदरे, महसूल सहायक भूसंपादन मंगेश ढुमणे आणि रेणुका येंबारे यांचा समावेश आहे.


 

जिल्‍हा रुग्‍णालयातील RTPCR प्रयोगशाळेमध्‍ये प्राप्‍त नमुन्‍यांची वेळेत तपासणीवेळेत अहवाल, विगतवारी करणे व सर्व संबंधितांना पाठविणे याबाबतचे संपुर्ण सनियंत्रण करणे. जिल्‍हा रुग्‍णालयातील RTPCR प्रयोगशाळेमध्‍ये महानगरपालिका व तालुका स्‍तरावरून तसेच खाजगी प्रयोगशाळा यांनी घेतलेले एकुण नमुणे व त्‍याअनुषंगाने कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या दैनंदिन याद्या घटना व्‍यवस्‍थापक यांना पाठविणे व अहवाल सादर करणे. जिल्‍हा रुग्‍णालयातील RTPCRप्रयोगशाळा व जिल्‍ह्यातील खाजगी प्रयोगशाळेमार्फत संकलन करण्‍यात येणा-या नमुन्‍यांबाबतची माहितीचे संकलन करणे तसेच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्‍ह व निगेटिव अहवाल पोर्टलवर अपलोड करणेबाबतच्‍या कार्यवाहीचे सनियंत्रण करणे. जिल्ह्यातील खाजगी प्रयोगशाळांच्‍या प्रतिनिधींच्‍या बैठका घेणे व कोरोना चाचण्‍यांची शासकीय दरानुसार फी आकारणेपोर्टलवर माहिती अपलोड करणे इत्‍यादी बाबत मार्गदर्शन करणे व निर्देश घेणे. जिल्‍हा रुग्‍णालयातील RTPCR चाचणी प्रयोगशाळेसाठी तसेच तालुका पातळीवर सॅम्‍पल कलेक्‍शनसाठी आवश्‍यक ती साधनसामग्री जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकअहमदनगर यांचेमार्फत पुरविणेकामी करावयाच्‍या कार्यवाहीचे समन्‍वय व सनियंत्रणाची जबाबदारी या पथकावर राहणार आहे.

 

बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन आणि ह़ॉटस्पॉट बाबत समन्वय साधून जबाबदारी पार पाडण्याकरिता उपजिल्हाधिकारी (रोहयो)  उदय किसवे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना साहाय्य करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, तहसीलदार (सामान्य प्रशासन) वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार (रोहयो) आर.ए. भालसिंग, नायब तहसीलदार निवडणूक प्रशांत गोसावी, लेखाधिकारी (रोहयो शाखा) दिलीप दुर्गे यांचा समावेश आहे.

 

प्रती कोरोना बाधीत रुग्‍णामध्‍ये किमान 20 सहवासित शोधुन त्‍यांची कोरोना चाचणीच्‍या अनुषंगाने करावयाच्‍या कार्यवाहीबाबत सर्व घटना व्‍यवस्‍थापक यांचेशी समन्‍वय साधुन कार्यवाही करुन घेणेमहानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बाबतच्‍या दैनंदिन अहवालानुसार किमान 20 सहवासितांपेक्षा कमी प्रमाण आढळुन आलेल्‍या ठिकाणच्‍या संबंधित घटना व्‍यवस्‍थापक, मुख्‍याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत यांचे समन्‍वयाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविणे बाबत योग्‍य ती कार्यवाही करणे.  कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन व ह़ॉटस्पॉट जाहीर करणे व त्‍याबाबत मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सर्वेक्षण करणे व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर मर्यादासंशशित रुग्‍णांची तपासणी इत्‍यादी बाबतची कार्यवाही संबंधित घटना व्‍यवस्‍थापक यांचेकडुन करुन घेणे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन व ह़ॉटस्पॉटचे दैनंदिन अहवाल प्राप्‍त करुन घेणे तसेच कोविड पोर्टलवर घटना व्‍यवस्‍थापक यांचेकडुन अपलोड करुन घेण्‍याबाबतचे सनियंत्रण करणे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन व ह़ॉटस्पॉट बाबत वस्‍तुनिष्‍ठ अहवाल वेळोवेळी जिल्‍हाधिकारी यांना सादर करणे, अशी जबाबदारी या पथकावर असेल.

 

जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीएचसी) आणि डीसीएच मधील रुग्णांसाठीच्या खाटांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना साहाय्य करण्यासाठी  मनपा उपायुक्त (कर) यशवंत डांगे, तहसीलदार (भूसुधार) श्रीमती एस.डी. ज-हाड, तहसीलदार (निवडणूक) चंद्रशेखर शितोळे, अव्वल कारकून (कूळकायदा शाखा) विशाल नवले, किरण देवतरसे, शेखर साळुंके, महसूल सहायक (करमणूक कर) आशा गायकवाड, प्रशांत बारवकर आणि लक्ष्मण बेरड (कुळकायदा शाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

जिल्‍ह्यातील कार्यरत सर्व सार्वजनिक व खाजगी सीसीसीडीसीएचसी व डीसीएच यांची नोडल अधिका-यांसह माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकअहमदनगर व आरोग्‍य अधिकारी, महानगरपालिकाअहमदनगर यांचेकडून प्राप्त  करून घेणे. जिल्‍ह्यातील कार्यरत सर्व सार्वजनिक व खाजगी सीसीसीडीसीएचसी व डीसीएच यांची covidbed.ilovenagar.com या पोर्टलवर नोंद करुन घेणे तसेच रुग्‍णालय प्रशासनाकडुन सदर पोर्टलवर माहिती अपलोड करणेकामी समन्‍वय अधिकारी यांच्‍या नेमणुका करूण घेणे. जिल्‍ह्यातील कार्यरत सर्व सार्वजनिक व खाजगी सीसीसीडीसीएचसी व डीसीएच यांची एकूण बेड क्षमताऑक्‍सीजन बेडव्‍हेन्‍टीलेटर बेड तसेच सदर व्‍यवस्‍थामध्‍ये दैनंदिनरित्‍या रूग्‍ण दाखल असलेल्‍या बेडची संख्‍या व रिक्‍त बेड इत्‍यादी माहिती संबंधित नोडल अधिकारी यांचेकडून प्राप्‍त करून घेणे व covidbed.ilovenagar.com या वेबपोर्टलवर अपलोड करून घेण्‍याचे कामकाजाचे समन्‍वयन करणे. जिल्‍ह्यातील कार्यरत सर्व सार्वजनिक व खाजगी सीसीसीडीसीएचसी व डीसीएच यांचेकडुन covid19.nhp.gov.in या पोर्टलवर अद्ययावत माहिती अपलोड करुन घेणे. शासनाद्वारे वेळोवेळी प्राप्‍त होणा-या कोविड रुग्‍ण संख्‍येच्‍या संभाव्यतेनुसार जिल्‍ह्यातील सार्वजनिक व खाजगी सीसीसीडीसीएचसी व डीसीएच मधील उपलब्‍ध बेड संख्‍या व करावयाच्‍या पूर्व तयारीबाबत वस्‍तुनिष्‍ठ अहवाल वेळोवेळी जिल्‍हाधिकारी यांना सादर करणे, अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा