नवीन वाढीव 14 हेक्टर जमिनीचा ताबा लवकरच मिळणार ------अध्यक्ष विवेक कोल्हे


कोपरगांव - प्रतिनिधी

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादीत झालेले उत्पादन देशभरात पोहचविण्याचे काम वसाहतीच्या माध्यमातुन होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असुन उद्योजकांना पायाभुत सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. हवाई वाहतूक रेल्वेची सुविधा विविध रस्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सहज उपलब्ध होतो असल्याने उदयोजकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे प्रतिपादन औद्योगिक
सहकारी वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. नवीन वाढीव 14 हेक्टर जमिनीचा ताबा ही लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले


औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटी या संस्थेची ६० वि वार्षिक सर्वसाधारण सभा आॕनलाईन पार पडली. या प्रसंगी अध्यक्षपदावरून  कोल्हे बोलत होते. यावेळी ते  म्हणाले , औदयोगिक वसाहतीमधील उदयोजकांना उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतांना भावी काळात मल्टीपरपज सभागृह, रस्त्यांचे डांबरीकरण, वाॅटर टॅंक, वीजेचे प्रश्न सुरळीत करणे, ड्रेनेज आदी बाबी  पुर्ण केल्या जात आहेत. संजीवानी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाने नवीन मंजूर वाढीव जमीन मिळण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असुन सुमारे १४ हेक्टर जमीनीचा ताबाही लवकरच मिळणार आहे.
याप्रसंगी अहवाल सालात कोरोना कालावधीत दिवंगत झालेले, शहिद जवान, अज्ञात,  शास्त्रज्ञ, समाजसेवक, संशोधक, थोर साहित्यीक, लेखक, क्रिडापटु इतर क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, संस्थेचे सभासद,  हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
याप्रसंगी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक मनीष  कोठारी यांचा कोठारी फूड प्राॅडक्ट या उद्योगाला आदर्श उद्योजक तर व्हीजन इन्सुलेशन प्राॅडक्टचे उद्योजक देवीप्रसाद श्रीकांत मिश्रा यांना नवउद्योजक पुरस्कार अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते देवुन सन्मान करण्यात आला.  
संस्थेचे  अध्यक्ष विवेक  कोल्हे,  उपाध्यक्ष मुनिष ठोळे, संचालक मनोज अग्रवाल, अनिल सोनवणे, केशवराव भवर, पराग संधान, रविंद्र नरोडे, पंडीत भारुड, चंद्रशेखर आव्हाड, सुकृत शिंदे, रविंद्र आढाव, ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, शिमला सारदा, रोहित वाघ, प्रशांत होन, सोमनाथ  निरगुडे, सहाय्यक निबंधक कोपरगांव यांच्यासह आयोजित केलेल्या वार्षीक सर्वसाधारण सभेस आॕनलाईन सभासद उपस्थित होते.  सुत्रसंचालन संचालक पंडीत भारुड, व्यवस्थापक एस.डी. लोखंडे यांनी  तर आभार संस्थेचे संचालक केशवराव भवर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा