कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आणि रुग्णालयातील बेड्स उपलब्धतेवर आता जिल्हा प्रशासनाची नजर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नियुक्त केले तीन नोडल अधिकारी
अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना केल्या असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) अजित थोरबोले, बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), कंटेन्टमेंट आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोन आणि ह़ॉटस्पॉट बाबत समन्वय साधून जबाबदारी पार पाडण्याकरिता उपजिल्हाधिकारी (रोहयो) उदय किसवे आणि जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीएचसी) आणि डीसीएच मधील रुग्णांसाठीच्या खाटांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) अजित थोरबोले यांची नियुक्ती