संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये शिव जयंती उत्साहात साजरी...... छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचे काम अविरत सुरु ठेवावे - पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव.......
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांची जयंती जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत, पोवाडे, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य नाटक असे विविध कार्यक्रम आयोजन करुन संजीवानी इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे मॕनेजिंग ट्रस्टी . रेणुका कोल्हे, स्कुलचे अॕकडमीक हेड हरीभाऊ नळे, प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन शालेय विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यकामाचे प्रास्तविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय शालेय विद्यार्थी आर्या देशमुख यांनी केलतर सुञसंचालन हिमांशु बाविस्कर, उत्सवी देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे आभार शिवानी वल्टे यांनी केले. संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे वतीने मॕनेजिंग ट्रस्टी. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राज्यातील पोलीसांनी कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावतांना कसालाच विचार मनी न आणता, डोक्यात अन डोळयांदेखील केवळ खाकी अन कर्तव्य ठेवुन जीवावर उदार होऊन नागरिकांचे संरक्षण पोलीसांनी दिले त्या बद्दल संजवनी इंग्लीश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी
पोलीसांना सॅल्युट करुन आभार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी गौरव आभाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तर कावेरी आढाव हिने माँसाहेब जिजाऊ, यांची वेशभूषा केली यावेळी इतर विद्यार्थी देखील बालमावळे यांच्या वेशभूषेत उपस्थितीत होते.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव बोलतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे मावळे उभे केले यासाठी सर्व जातीधर्म एकत्र आले पाहिजे आजकाल महिलांवर अत्याचाराचे प्रमाणे देखील वाढले आहे. महाराजांचे विचारांवर चालण्याची आज गरज आहे. शिवाजी महाराज घडणे महत्वाचे नाही ज्यांनी घडविले तसे जिजामाता सारखे मुली देखील घडणे महत्वाचे असल्याचे मत तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केले.
संजवनी इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबत शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे , विश्वस्त बिपीन कोल्हे, विश्वस्त . स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपक्रमाची प्रशांसा करुन विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment