सरपंच पदासाठी आरक्षणानुसार महिला उमेदवारच नसल्याने तीन गावांचे आरक्षण पुरूषांसाठी खुले ......!!!!! सरपंच पदी आता महिला ऐवजी पुरुषांना संधी


कोपरगाव :
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी सरपंच  आरक्षण सोडत काढण्यात आली. यात  तिळवणी, मढी खुर्द  व येसगाव  
 तीन गावाच्या सरपंच आरक्षणानुसार निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला होता.शासन आता या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलणार का?  या प्रवर्गातील स्त्री उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे.याकडे सर्वांचे लक्ष लागून होते .मात्र जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार या तीनही गावच्या सरपंच  पदाचे आरक्षण जाती व जमातीसाठी खुले करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार तथा तात्कालीन निवडणूक निर्णय आयोग प्रधिकृत अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली.
सोयीचे आरक्षण न निघाल्याने निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे मनसुबे उधळले गेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

तिळवणी, मढी खुर्द या दोन ग्रामपंचायतीच्या ठिकाणी  अनुसूचित जाती महिला राखीव ठेवण्यात आले होते,या ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी एकही प्रभाग आरक्षित नव्हता, त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला सदस्य नाही.
 तर येसगाव ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती  महिलासाठी राखीव करण्यात आले होते. या ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी एकही प्रभाग आरक्षित नव्हता, त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला सदस्य नाही.

या तीन गावाच्या ग्रामपंचायत  सरपंचपदाचे काय? यासंबंधी जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने  १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी भाग शिर्डी यांची नेमणूक करण्यात आली होती .यासंबंधी तहसिलदार 'तथा'  तात्कालीन निवडणूक निर्णय आयोग प्राधिकृत अधिकारी योगेश चंद्रे म्हणाले,'नव्या आरक्षण सोडतीनुसार ज्या गावात सरपंचपदासाठी उमेदवार नाही,तेथे प्रचलित कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाने पूर्वीचे आरक्षण रद्द करून नव्याने शुक्रवारी (ता.२६) फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी बाग शिर्डी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार 'तथा'  तात्कालीन निवडणूक निर्णय आयोग प्राधिकृत अधिकारी योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत नवीन आरक्षणाची सोडत काढली. यांत या तिन्ही गावाच्या सरपंचपदाचे महिला उमेदवारच नसल्याने तीन गावांचे आरक्षण खुले करण्यात आले आहे त्यामुळे आता तिळवणी, मढी खुर्द या दोन ग्रामपंचायतीच्या ठिकाणी  अनुसूचित जाती माहिला राखीव ऐवजी अनुसूचित जाती पुरुष यांना संधी मिळणार आहे.तर येसगाव ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती  महिला राखीव ऐवजी अनुसूचित जमाती पुरुष यांना संधी मिळणार आहे.या तीनही ग्रामपंचायती साठी आरक्षणा प्रमाणे पुरुषांना संधी मिळणार आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा