महिलाप्रधान एजंटचे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी................ पोस्टल संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार

 

महिला प्रधान एजंट यांचेकडून आयोजित पोस्टल संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रसंगी बोलताना नुतन विभागीय सचिव श्री संदीप कोकाटे समवेत संतोष यादव अजित रायकवाड

अहमदनगर:
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर शाखेच्या कार्याध्यक्षपदी  अहमदनगर आर एस पोस्टऑफिसचे सबपोस्ट मास्तर श्री संतोष यादव तर विभागीय सचिवपदी आनंदीबाजार पोस्टऑफिसचे सबपोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे यांची निवड झालेबदल आनंदीबाजार पोस्टऑफिसच्या महिला प्रधान एजंट यांचे तर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अल्पबचत संघटनेचे अध्यक्ष श्री उदय गंधे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ महिला प्रधान एजंट श्रीमती स्मिताताई फडके यांनी केले त्यानी आपल्या भावना  कवितेतून व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
 याप्रसंगी  पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव बोलताना म्हणाले की, महिला प्रधान एजंट या डाक विभागाचे अविभाज्य घटक असून त्याचेकडून समाजामध्ये डाक विभागाचे अनमोल काम होत असून समाजातील  सर्व घटकांना बचतीची सवय लावत,घरोघरी जाऊन त्याची बचत जमा करत ती  पोस्टऑफिसच्या अल्पबचत योजनेत त्याचेद्वारे गुंतवणूक होत आहे त्याचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे.त्याच्या या कार्यास  शुभेच्छा दिल्या. 
दि 25 फेब्रुवारी ते 26 मार्च 2021 या दरम्यान पोस्टऑफिस कडून  प्रस्तावित असणारी ध्येयलक्ष प्राप्ती योजनेअंतर्गत अधिकाधिक नवीन खाते उघडणे असून हे लक्ष्य साध्य करणेसाठी आम्हास आपले अनमोल सहकार्य  अपेक्षित आहे ते आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.आपला हा सत्कार आमचेसाठी अनमोल ठेवा आहे हे नमूद करत सर्वाना धन्यवाद दिले.
यावेळी पोस्टल संघटनेचे नुतन विभागीय सचिव श्री संदीप कोकाटे, श्री बंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास श्री अजित रायकवाड,श्रीमती आरती भालेराव , श्रीमती स्मिता फडके,श्रीमती बापट,श्रीमती बाले,श्रीमती राजश्री कुलकर्णी,श्रीमती सपना जाधव,श्रीमती शर्वरी देशपांडे,श्रीमती मीनाक्षी पाठक,श्रीमती अंजली गंधे, श्रीमती रेखे,श्री उदय गंधे,श्री बंड ,श्री निकम , श्री बैचे, श्री प्रवीण कुलकर्णी, श्री वज्रनाथ न्यालपेल्ली, श्री लिंबाजी गायकवाड हे  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा