शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार" शालेय स्पर्धेवर होणार परीणाम, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी ऑगष्ट मध्ये सुरु होत असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन - नियोजनास सहकार्य न करण्याचा एकमुखी निर्णय न्यू आर्टस कॉलेज, अहमदनगर येथे नगर, पारनेर व राहुरी तालुक्याच्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला. शालेय स्पर्धा आयोजन नियोजना संदर्भात क्रीडा कार्यालयाकडून आज नगर येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ चा शालेय स्पर्धा आयोजनाचा न मिळालेला निधी, खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र न मिळणे, सिंथेटिक ट्रॅक नसल्याने खेळाडूंचे होत असलेले नुकसान, शालेय स्पर्धेत साहित्य व सुविधांची वानवा, क्रीडा अनुदान प्रकरणे न मंजुर करणे, क्रीडा अनुदान वाटपात अपहार, तुटपुंजे पंच मानधन, निधी कपात, सुविधेच्या नावाखाली आकारली जाणारी ऑनलाईन कॉन्व्हेनीयन्स फी, ऑनलाईन मधील त्रुटी, क्रीडा स्पर्धेनंतर तालुका प्रमुखांना व शिक्षकांना मिळणारी वागणूक या संदर्भात शारीरिक शिक्षक व पदाधिकारी फारच आक्रमक झाले ह...
Comments
Post a Comment