मागेल तिथे नाही, तर पालिकेच्या मालकी जागेवरच खोका शॉप ला परवानगी मिळेल --- मा.सहाय्यक संचालकाकडून शिष्टमंडळाला स्पष्ट उत्तर

 


बाजारतळातील खोका शॉपसाठी  केवळ औपचारिकता बाकी

कोपरगाव : काँग्रेस कमिटी जवळ,धारणगाव रोड,पुनम थिएटर समोर,एस.जी.विद्यालय भिंतीलगत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, टिळक नगर शॉपिंग जवळ,येवला रोड,बुब हॉस्पिटल जवळ इ.ठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी द्यावी अशी मागणी बुधवारी 24 रोजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह शिष्टमंडळाने मा.सहाय्यक संचालक, नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग, अहमदनगर यांच्याकडे केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात मागेल तिथे नाही तर पालिकेच्या मालकी जागेवरच खोका शॉप ला परवानगी मिळेल असे उत्तर दिले असल्याची माहिती खुद्द नगराध्यक्ष विजय वहाडणे  यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पत्रकारांना दिली. 
तर बाजारतळ येथे खोका शॉपसाठी मान्यतेची केवळ औपचारिकता उरलेली आहे , असेही ते म्हणाले, 

नगर येथे झालेल्या बैठकीत शहरातील सुशिक्षित-अशिक्षित बेरोजगार, छोट्या व्यावसायिकांना, विस्थापितांना जास्तीतजास्त खोका शॉप उपलब्ध व्हावेत यासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष निखाडे,संदिप वर्पे, मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,मंदार पहाडे,कैलास जाधव,विनायक गायकवाड व सहकारी, कनिष्ठ अभियंता बडगुजर,व्यापारी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
             
 काँग्रेस कमिटी जवळ,धारणगाव रोड,पुनम थिएटर समोर, एस.जी. विद्यालय भिंतीलगत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, टिळक नगर शॉपिंग जवळ,येवला रोड,बुब हॉस्पिटल जवळ इ.ठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली असता माननीय सहाय्यक संचालक श्री.बागुल व श्री.पवार या व्दयीने  फक्त नगरपरिषदेच्या मालकी असलेल्या जागेवरच परवानगी (मान्यता) मिळेल असे स्पष्ट शब्दात शिष्टमंडळाला उत्तर दिले.  आता यानंतर खोका शॉपसाठी अजून काय करता येईल यावर निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर मिटिंग घेऊन  चर्चा विचारविनिमय करावा लागणार आहे. मात्र याबाबत निर्णय घेताना शहरातील व्यापारी नागरिक व रहदारीला अडथळा होणार नाही याचे भान ठेवावे लागणार आहे. असेही वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे. यासाठी एखादी सर्वसमावेशक कमिटी स्थापन करावी लागणार आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. असेही  त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
पण कृपया या विषयावर सोशल मिडिया किंवा बातम्यांद्वारे कुणीही आरोप-प्रत्यारोप करू नयेत.ज्यांना याबाबत काही सुचवायचे असेल तर लेखी कळवावे किंवा प्रत्यक्ष चर्चा करावी. असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"