कोपरगाव बेट भागातील परमसदगुरु शुक्राचार्य मंदिरात यंदाचा महाशिवरात्रि उत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द
कोपरगाव प्रतिनिधी
कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता व शासनाच्या आदेशानुसार यावर्षी कोपरगाव बेट भागात होणारा महाशिवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणीही गुरु शुक्राचार्य मंदिराकडे येऊ नये असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना श्री आव्हाड पुढे म्हणाले श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट यांच्या वतीने दरवर्षी सर्वात मोठा वार्षिक उत्सव म्हणून महाशिवरात्री गुरुवार दिनांक 11 मार्च रोजी आहे सध्या सर्व जगावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे राज्यभरात ही कोरोना वाढत आहे त्यामुळे सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर भाविक भक्तांसाठी त्या दिवशी बंद राहणार आहे मंदिर प्रशासनाने नेहमीच सामाजिक-धार्मिक बांधिलकी ठेवून गतवर्षी कोरोना चा प्रसार वाढू नये म्हणून बेट भाग परिसरात सॅनिटायझर व हँड वाश चे मोफत वाटप करून आठ महिने मंदिर बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले होते यावर्षीही कोरोना अजून गेलेला नसल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे मात्र गुरु शुक्राचार्य यांचे धार्मिक कार्यक्रम नित्य नियम विधी पुजाऱ्याच्या मार्फत केले जाणार आहेत त्याआधी गेल्या काही वर्षापासून गोदावरी नदीवरील शुक्राचार्य घाट ते शुक्राचार्य मंदिर या रस्त्याला गुरु शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग असे नामकरण करण्यात यावे म्हणून मागणी केली होती त्यास नगर परिषद नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी बहुमताने त्यास मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांच्याच हस्ते परम सद गुरु शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग या फलकांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक नगरसेविका सपना मोरे सचिन परदेशी प्रसाद परे संजय वडांगळे मुन्ना आव्हाड यांचेसह कमिटीचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भाविक भक्तांच्या सोयीसाठी परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य महाराजांचे फेसबुक वर लाईव्ह अभिषेक दर्शन सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी 9 ते रात्री बारा पर्यंत दाखवले जाणार असल्याची माहिती बाळासाहेब आव्हाड यांनी दिली.
Comments
Post a Comment