कोपरगाव नगरपालिकेचे ४५ लाखाचे लाख शिलकीचे अंदाजपत्रक
नागरिकांना दिलासा कुठलीही करवाढ नाही
कोपरगाव: प्रत्यक्ष करवाढ नसलेले, कोणत्याही आणि नव्या प्रकल्पांची घोषणा टाळून आधीची कामे पूर्ण करण्यावर भर देणारे कोपरगाव नगर पालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे २२१ कोटी ३० लाख ,१६ हजार २१३ (केंद्रीय योजनांसह) ४५ लाख ७१ हजार २१३/- इतक्या शिल्लकेचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गुरुवारी २५ रोजी सभागृहाला सादर केले. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या विविध घोषणा आणि विकासाचे दावेच पुन्हा नव्याने करण्यात आले आहेत.
कोपरगाव नगरपालिकेच्या खर्चाच्या मानाने महसूल उत्पन्न कमी असल्याने ते वाढविण्यासाठी नागरिकांवर कराचा कुठलाही बोजा न टाकता बसून उत्पन्न वाढविण्यासाठी पार्किंग जाहिरात आधीचे नवीन नवीन योजना मांडण्यात आले आहेत. कोपरगांव नगरपरिषदेने ४५लाख ७१ हजार २१३ रूपये इतक्या शिल्लकेचे अंदाजपत्रक सादर केले असून यात महसुली व भांडवली जमा १९१कोटी ११लाख ,५६ हजार रुपये अपेक्षित ठेवले असून मागील वर्षीय शिल्लक लक्षात घेता २२१ कोटी ३० लाख ,१६ हजार २१३/- रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चास अनुमती दिलेली आहे. यात कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्त वेतनाचा खर्च १२ कोटी ४५ लाख ७५ हजार रुपये/- व त्याच प्रमाणे सार्वजनिक सुरक्षितता / आरोग्य शिक्षण व संकीर्ण इ. सर्व विभागाचा आवश्यक खर्च १४ कोटी ०६, लाख ४० हजार रुपये इतका गृहीत धरला आहे. त्याच प्रमाणे भांडवली खर्च १९४ कोटी ३२ लाख ३० हजार रुपये आहे. त्यात प्रामुख्याने हद्दवाढ विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमरधाम बांधकाम, सौर उर्जा प्रकल्प, नाट्यगृह बांधकाम व व्यापारी संकुल तसेच शासनातर्फे मिळणाऱ्या १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर व राज्यस्तर), रस्ता निधी व विशेष रस्ता निधी अंतर्गत शहरातील रस्ता सुधारणेकामी तसेच वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत क्रिडांगण, बगीचे सौंदर्यीकरण, व केंद्र शासनाद्वारे बायोगॅस प्रकल्प या सारखे शहरातील विकासाची कामे करणेकामी उपरोक्त योजने अंतर्गत विविध विकास कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment