लायन्स डायलिसिस सेंटर चे उदघाटन उत्साहात संपन्न


 कोपरगाव प्रतिनिधी

नव्याने सुरू झालेल्या येशील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल  लायन्स डायलिसिस सेंटरचे उदघाटन लायन्स डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल  अभय  शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी व्यासपीठावर परमानंद शर्मा , आय.एम.ए. कोपरगाव चे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र गोंधळी , निमा चे अध्यक्ष डॉक्टर नितीन झवर , हॉस्पिटलचे संचालक  चांगदेव कातकडे , प्रसाद कातकडे तसेच लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष  सत्येन मुंदडा , लायन्स क्लब चे अध्यक्ष सुधीर डागा, लायनेस क्लब च्या अध्यक्षा  सौ किरण  डागा, लिओ क्लब चे अध्यक्ष  रोहित पटेल ,डॉक्टर अभिजित आचार्य आदी उपस्थित होते   

 या सेंटरमुळे गरजू रुग्णांना फायदा होणार असून आता त्यांना डायलिसिस उपचारासाठी बाहेर गावी जाण्याची गरज पडणार नाही . कोपरगाव येथेच अगदी सवलतीच्या दरात  चांगले उपचार मिळणार आहेत . गरजूंनी  लायन्स क्लब च्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन   सत्यम मुंदडा  यांनी केले  

 डॉक्टर महेंद्र गोंधळी व डॉक्टर  नितीन झंवर यांनी लायन्स च्या सेवा कार्याचे कौतुक केले व या डायलिसिस सेंटर ची उपयुक्तता सांगितले   
 लायन्स चे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात लायन्स लायनेस व लिवो क्लब  च्या सेवा कार्याचे  कौतुक केले व संपूर्ण प्रांतांमध्ये आम्ही लायन्स क्लब कोपरगाव कडे एक आदर्श व मार्गदर्शक क्लब म्हणून बघतो व असेच सेवा कार्य अविरतपणे पुढे चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी  केले .
संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक कातकडे व हॉस्पिटल चे आभार  सुधीर डागा यांनी मानले व गरज पडल्यास आणखी एक डायलिसीस मशिन भेट देऊ असे सांगितले  
 या प्रसंगी हॉस्पिटलच्या नेफरोलॉजिस्ट व टेक्‍निशियन यांचा सत्कार करण्यात आला.

 हे सेंटर कार्यान्वित करण्यासाठी  सत्येन मुंदडा , सुधीर डागा , संदीप रोहमारे , तुलसीदास  खुबानी , राजेश ठोळे, अभिजीत आचार्य , डॉ.संजय उंबरकर यांनी विशेष परिश्रम घेतले .
सूत्रसंचालन  राम थोरे यांनी करून आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा