आम्मा असोसिएशन तर्फे १० पी जी आर उत्पादने नोंदणी प्रक्रिया सुरु !
कोपरगाव प्रतिनिधी
केंद्र सरकारने पी जी आर नोंदणी प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर करून त्याचे फर्टीलायझर कंट्रोल कायदा ८५ मधे रूपांतर केले. त्यामुळे लघु उद्योजकांना मोठा दिलासा दिला. या पार्श्वभूमीवर आज आम्मा असोसिएशन मार्फत निवडक १० उत्पादने नोंदणीसाठी निश्चित कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना आवाहन असोसिएशन तर्फे डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे अध्यक्ष आम्मा ,उपाध्यक्ष डॉ रामनाथ जगताप,सेक्रेटरी प्रशांत धारणकर ,संचालक लक्ष्मण डोळे यांनी जाहीर केले.
देशात लघुउद्योग क्षेत्रातील उद्योजक मोठ्या प्रमाणात असून त्यांनी उच्च दर्जाचं संशोधन केले आहे जे नोंदणीच्या प्रतिक्षेत होती. या उत्पादनांना राजमान्यता मिळाल्यांनतर शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीचा मार्ग मोकळा होत आहे.
या बदलाने नवीन स्टार्टअपला चालना मिळून उद्योजकता विकास होईल व सरकारच्या धोरणाला गती हि मिळेल. उत्पादन वाढीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तसेच लघु उद्योगामध्ये पी जी आर उत्पादने जागतिक पातळीवर पोहचून भारत त्याचे हब म्हणून लवकरच ओळख निर्माण करेल , असे मत डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment