टपाल कर्मचाऱ्यांच्या न्याय व प्रलंबित प्रश्नावर पाठपुरावा सुरूच ...श्री राहाटे यांचे प्रतिपादन
अहमदनगर: टपाल कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याविषयी संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला जात आहे शांत बसून किंवा नुसते बोलून समस्या सुटणार नाहीत त्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन पोस्टल एम्प्लॉईजचे माजी सेक्रेटरी जनरल मा श्री टी एन राहाटे यांनी केले.
संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी श्री संतोष यादव, आर एच गुप्ता, बी एस शिंदे,आर एच लांडगे,के एस पारखी,डी आर देवकर,पी एस शिंदे,एस डी जावळे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासोबतच त्याच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन त्यानी या वेळी दिले.
संघटना ही सभासदाचे हित जपण्यासाठी असते. एकमेकांचे उणेदुणे काढण्यासाठी संघटना नसते त्यामुळे सभासदांनी संघटित राहावे असे आवाहन श्री संतोष यादव यांनी केले.
यावेळी पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी श्री शिवाजी जावळे,कार्याध्यक्षपदी संतोष यादव तर विभागीय सचिवपदी श्री संदीप कोकाटे यांची तर पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी श्री नामदेव डेंगळे,विभागीय सचिवपदी श्री प्रदिप सूर्यवंशी तर खजिनदार पदी श्री शुभांगी शेळके यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी जावळे हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री संतोष यादव तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश कदम यांनी केले
Comments
Post a Comment