लायन्स क्लब ऑफ निफाड व लायन्स क्लब ऑफ कोळपेवाडी ची अधिकृत घोषणा
कोपरगाव प्रतिनिधी
लायन्स क्लब च्या कोपरगावात नव्यानेच सुरू झालेल्या कातकडे परिवाराच्या चॅरिटेबल संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या हॉल मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत लायन्स क्लब ऑफ निफाड ,(चार्टर प्रेसिडेंट ला.सौ.जयश्री भटेवरा) व लायन्स क्लब ऑफ कोळपेवाडी (चार्टर प्रेसिडेंट म्हणून ला..मयूर सारडा) यांची निवड मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आल्याचे .सत्येन मुंदडा यांनी सांगितले.
लायन्स क्लब कोपरगाव च्या लायन्स डायलिसिस सेंटर च्या उदघाटन प्रसंगी प्रांतपाल ला अभय शास्त्री व कॅबिनेट सेक्रेटरी परमानंद शर्मा यांनी क्लब अध्यक्ष . सुधीर डागा व .मनोज कडू यांना सेवकार्याबद्दल सन्मानपत्र देऊन क्लब च्या संदीप रोहमारे , संदीप कोयटे , राजेश ठोळे , शैलेंद्र बनसोडे , अभिजित आचार्य , डॉ उंबरकर ,राम थोरे , आनंद ठोळे व सर्व सदस्यांचे तोंडभरून कौतुक केले .
कोपरगाव लायन्स क्लब ने आत्तापर्यंत ९ कायमस्वरूपी प्रकल्प उभारून गरजवंतांच्या सेवा करून सम्पूर्ण प्रांतात नावलौकिक मिळवला असल्याचे सांगून ला. .राजेंद्र शिरोडे , बाबा खुबाणी , लायनेस किरण डागा , लिओ रोहित पटेल यांचे सह सर्व सदस्यांचे योगदानाबद्दल विशेष आभार मानले .
निफाड क्लब सुरू करण्यासाठी ला.सौ.हिना ठक्कर यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल व निफाड आणि कोळपेवाडी परिसरात विविध सेवकार्ये करण्यास कोपरगाव क्लब सर्वतोपरी मदत करणार असल्याचे
.सुधीर डागा यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी क्लब ने जागेबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोपरगाव येथील उद्योजक सुधीर सोहनलाल बज परिवाराने १५ गुंठे जागा देणगी स्वरूपात देण्याची घोषणा केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लिओ प्रसाद कातकडे व एस जे एस हॉस्पिटल चे .जानवेकर सर व सर्व स्टाफ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment