गुरु शुक्राचार्य मंदिर परिसरा विकासा साठी व गोदावरी नदीवरील घाट सुशोभीकरणासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून मागणी करणार -----नगराध्यक्ष विजय वहाडणे
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव बेट भागात असणाऱ्या परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिराचा परिसराचा तसेच गोदावरी नदीवरील घाट सुशोभीकरणासाठी विविध विकास कामांसाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास अठरा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव ठेवून निधी मागण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी गुरु शुक्राचार्य मंदिरात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी दिली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक कालू आप्पा आव्हाड नगरसेविका सपना मोरे व मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड उपस्थित होते श्री वहाडणे पुढे म्हणाले कोपरगाव तालुक्यात धार्मिक मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र पौराणिक असलेल्या कोपरगावच्या गुरु शुक्राचार्य तसेच पुणतांबा येथील चांगदेव महाराज मंदिरां बाबत अनेकांना त्याची महती माहिती नाही पौराणिक मंदिरांचे जतन व्हावे त्या देवालायांची महती दुरवर पर्यंत जावी यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून जेवढी चांगली कामे करता येतील ती सर्वांच्या सहकार्याने कोणतेही राजकारण न आणता करण्याचा मानस आहे त्यासाठी मंत्री ठाकरे व शिंदे यांच्याकडे सर्व नगरसेवक पक्षीय कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन जवळपास अठरा कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवून निधी ची मागणी करणार आहे. जनतेने आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे नागरिकांनी सांगितलेली कामे करून देणे हे आमचे परम कर्तव्य आहे असे मी समजतो गुरु शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग असे नामकरण सर्वांचा सहकार्यांनी सर्व नगरसेवकांनी एक मताने मंजुरी दिल्याने झाले आहे असे सांगून वहाडणे यांनी मंदिर प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्याची उत्तम कामाची दखल घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या व नगर परिषदेकडून सर्व तो परी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. गेल्या अनेक दिवसापासून गुरु शुक्राचार्य पालखी मार्ग असे रस्त्याचे नामकरण करावे म्हणून मागणी होती की आता पूर्ण झाली असून त्या फलकांचे उद्घाटन नगराध्यक्ष वहाडणे उपनगराध्यक्ष निखाडे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक नगरसेविका सपना मोरे नगरसेवक कालू आप्पा आव्हाड सत्यन मुंदडा आव्हाड गुरुजी बाळासाहेब आव्हाड व विविध ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आभार सचिन परदेशी यांनी मानले.
Comments
Post a Comment