एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन सहज शक्य_ खंडागळे

 


कोपरगाव : 
एकात्मिक ऊस व्यवस्थापन  पद्धतीचा अवलंब, बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बीजप्रक्रिया, लागवड, खत, तण आणि जल व्यवस्थापन याबाबतचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना सहज एकरी 100 मेट्रिक टनापर्यंत उसाचे उत्पादन घेता येते असा विश्वास निफाड कृषी संशोधन केंद्राचे कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे यांनी व्यक्त केला.

            राष्ट्रीय अन्नसुरक्षा व्यापारी पिके ऊस विकास अभियानाअंतर्गत तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी परिसरातील पांडुरंग लोंढे यांच्या शेतावर शेतकरी दिन व शिवार भेट कार्यक्रम बुधवारी कोरोना संसर्ग सामाजिक अंतराचे भान राखत  सर्व नियमांचे  पालन करून आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
          प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोकराव आढाव यांनी शासनाच्या विविध कृषी योजना व सोयाबीन, कांदा पिका बाबतचे व्यापारी धोरण व शाश्वत  शेतीतून कृषी विकास कसा साधायचा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी ऊस पिकात कांदा व इतर आंतरपिके कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन केले.   कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.   कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी कांदा लागवडी बाबतची माहिती दिली.
        याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे, संगीता खंडागळे, तुषार वसईकर, दिनकर कोल्हे, अनिरुद्ध घुगे, अविनाश पिंपळे, वसंत पावरा, संजय घनकुटे आदी उपस्थित होते तर माजी सरपंच पोपटराव पवार, आप्पासाहेब लोहकने,  सोपानराव रक्ताटे, बाबासाहेब  रक्ताटे, पांडुरंग लोंढे,किशोर गायकवाड, रमेश गायकवाड, अरुण देशमुख, चांगदेव लोंढे आदी शेतकऱ्यांनी ऊस व कांदा पिकाबाबत चर्चेत भाग घेऊन विविध   शंकांचे कसे निरसन करावाचे याचे मार्गदर्शन घेतले.
       श्री. पोपटराव खंडागळे पुढे म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञान व सोशल मीडियामुळे शेतकऱ्यांना विविध पिकाबाबत  तात्काळ माहिती उपलब्ध होत आहे, त्यातून उत्पादने घेतली जातात.   वाढत्या जागतिक हवामान बदल पीकपद्धती व आत्मनिर्भर भारतासाठी त्याअनुषंगाने जैविक बीजप्रक्रिया शाश्वत ऊस शेतीसाठी एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन तसेच रासायनिक बरोबरच जैविक खतांचा पुरेपूर वापर यातून एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन सहज शक्य आहे.    ऊस शेतीतून आता इथेनॉल, स्पीरिट यासारखी उप उत्पादने वापरली  जात आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले तर आभार संभाजीराव रक्ताटे यांनी मानले.
चौकट
          कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे यांनी यापूर्वी या भागातील असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीन, गहू, हरभरा, ऊस, फळ, भाजीपाला आदी पिकात विक्रमी ‍शाश्वत उत्पादना बरोबरच कीड रोग नियंत्रणiबाबत थेट बांधावर धडे देत प्रबोधन केले आहे.

फोटो ओळी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा व्यापारी पिके ऊस विकास अभियान अंतर्गत तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी परिसरातील पांडुरंग लोंढे यांच्या शेतावर शेतकरी दिन व शिवार भेट कार्यक्रमात कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे यांनी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातही त्यांनी काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा