पुणे येथील हॉर्स रायडिंग स्पर्धेत ‘राजस्व’चे दैदिप्यमान यश ; 10 पदकांची कमाई..........
अहमदनगर : येथील धर्माधिकारी मळा भागातील राजस्व हॉर्स रायडिंग क्लबच्या सदस्यांनी नेत्रदीपक यश मिळवून नगरचा नावलौकिक वाढविला. या क्लबचे प्रसाद भणगे, विजय जाधव, श्रीकांत शिंदे, मनाली जासूद, सुशांत तरवडे, अक्षर बुरगुल, विराज पारखे, सिद्धार्थ भिंगारदिवे, मयूर बेद्रे, हिंदवी पेटकर, श्रमाली लोळगे आदींनी विविध अश्व स्पर्धेमध्ये यश मिळवून पदक प्राप्त केले.
पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र इक्वेस्ट्रियन असोसिएशनअंतर्गत जॅपलुप इक्वेस्ट्रियन सेेंटर प्रा. लि., पुणे यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथे 4 ते 7 फेबु्रवारीदरम्यान वार्षिक इक्वेस्ट्रियन गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा बिगीतर, कन्फाईन, अॅमेचर, ज्युनिअर, ओपन अशा विविध गटांमध्ये घेण्यात आल्या. गेम्समध्ये ड्रसाज, शो-जंपिंग, पोलबेंडींग, ट्रॉटींग रेस, शो-जंपिंग, नॉर्मल, शो-जंपिंग रिले, शो-जंपिंग टॉप स्कोअर, हॅट रेस, बॉल अॅण्ड बकेट रेस यामध्ये समाविष्ट असतात.
या खेळांमध्ये लहान मुलांपासून म्हणजेच 7 वर्षे ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात. असे खेळ फक्त परदेशात खेळले जातात. आता ते आपल्याकडेही होतात. इंटरनॅशनल, नॅशनल स्टेटच्या अश्व स्पर्धा आता अनेक छोट्या-मोठ्या शहरांत होत आहेत.
पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मुंबई येथून अॅमेचर रायडर क्लब, द राईड टू लाईव्ह अॅकॅडमी, गुडवील स्टड तसेच पुणे येथून कॅडर इक्वेस्ट्रियन सेंटर, दिग्विजय प्रतिष्ठान, धुळे येथील मुकेश पटेल टू इक्वेस्ट्रियन अॅकॅडमी, शिरपूर तसेच नगरमधून राजस्व हॉर्स रायडींग क्लब यांनी सहभाग घेतला होता. राजस्व हॉर्स रायडिंग क्लबला गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये केवळ तीन पदके मिळाली होती. यावर्षी मात्र तब्बल 10 पदकांची कमाई या क्लबच्या सदस्यांनी केली.
राजस्व हॉर्स रायडिंग क्लबचे सदस्य प्रसाद भणगे यांना कन्फाईन गटामध्ये पोलबेंडींग रेसमध्ये सुवर्णपदक व ड्रसाज खेळामध्ये रौप्यपदक अशी 2 पदके मिळाली. अॅमेचर गटात विजय जाधव यांना ड्रसाजध्ये सुवर्णपदक व पोलबेंडींग रेसमध्येही सुवर्णपदक आणि या गटात 19 गुण मिळवून जॅपलूप स्पर्धेचे तिसर्या क्रमांकाचे मानकरी ठरले. अशी 3 पदके विजय जाधव यांना प्राप्त झाली.
क्लबचे सुशांत तरवडे यांना कन्फाईन गटामध्ये शो-जंपिंग या खेळात सुवर्णपदक व ड्रसाज खेळात कांस्यपदक अशी 2 पदके मिळाली. राजस्व रायडिंगचे मुख्य शिलेदार ‘लकी’ व ‘मारिओ’ अश्वांनी स्पर्धकांना त्यांच्या पाठीवर घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या अश्वांनाही सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्यांना जॅपलूप इक्वेस्ट्रियन सेंटरचे संचालक रोहनदादा मोरे यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
नगरची ओळख सर्वच क्षेत्रांत आहे. यामध्ये आता हॉर्स रायडींगचीही (इक्वेस्ट्रियन) भर पडली. या स्पर्धेतील उत्तुंग यशामुळे नगरची ओळख आता इक्केस्ट्रियन या क्षेत्रात संपूर्ण राज्यात झाली आहे. स्पर्धेमध्ये मयूर बेद्रे, श्रीकांत शिंदे, अक्षर बुरगुल, विराज पारखे, सिद्धार्थ भिंगारदिवे, हिंदवी पेटकर, श्रमाली लोळगे या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा सहभागितांना राजस्व हॉर्स रायडींग क्लबचे शिक्षक राजीव कानडे व सोमनाथ पेटकर यांचे मागदर्शन मिळाले.......
Comments
Post a Comment