Posts

Showing posts from February, 2021

गुरु शुक्राचार्य मंदिर परिसरा विकासा साठी व गोदावरी नदीवरील घाट सुशोभीकरणासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून मागणी करणार -----नगराध्यक्ष विजय वहाडणे

Image
कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव बेट भागात असणाऱ्या परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिराचा परिसराचा तसेच गोदावरी नदीवरील घाट सुशोभीकरणासाठी विविध  विकास कामांसाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास अठरा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव ठेवून निधी मागण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी गुरु शुक्राचार्य मंदिरात  झालेल्या  सत्कार समारंभ प्रसंगी दिली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक कालू आप्पा आव्हाड नगरसेविका सपना मोरे व मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड उपस्थित होते श्री वहाडणे पुढे म्हणाले कोपरगाव तालुक्यात धार्मिक मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र पौराणिक असलेल्या कोपरगावच्या गुरु शुक्राचार्य  तसेच पुणतांबा येथील चांगदेव महाराज मंदिरां बाबत अनेकांना त्याची महती माहिती नाही पौराणिक मंदिरांचे जतन व्हावे त्या देवालायांची महती दुरवर पर्यंत जावी यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून जेवढी चांगली कामे करता येतील ती सर्वांच्या सहकार्याने कोणतेही राजकारण न आणता करण्य

कोपरगाव बेट भागातील परमसदगुरु शुक्राचार्य मंदिरात यंदाचा महाशिवरात्रि उत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द

Image
कोपरगाव प्रतिनिधी   कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता व शासनाच्या आदेशानुसार यावर्षी कोपरगाव बेट भागात होणारा महाशिवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणीही गुरु शुक्राचार्य मंदिराकडे येऊ नये असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी  केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना श्री आव्हाड पुढे म्हणाले श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट यांच्या वतीने दरवर्षी सर्वात मोठा वार्षिक उत्सव म्हणून महाशिवरात्री गुरुवार दिनांक 11 मार्च रोजी आहे सध्या सर्व जगावर कोरोनाचे  संकट उभे ठाकले आहे राज्यभरात ही कोरोना वाढत आहे त्यामुळे सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर भाविक भक्तांसाठी त्या दिवशी बंद राहणार आहे मंदिर प्रशासनाने नेहमीच सामाजिक-धार्मिक बांधिलकी ठेवून गतवर्षी कोरोना चा प्रसार वाढू नये म्हणून बेट भाग परिसरात सॅनिटायझर  व हँड वाश चे मोफत वाटप करून आठ महिने मंदिर बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले होते यावर्षीही कोरोना अजून गेलेला नसल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे मात्र गुरु शुक्राचार्य यांचे धार्मिक कार्यक्

सरपंच पदासाठी आरक्षणानुसार महिला उमेदवारच नसल्याने तीन गावांचे आरक्षण पुरूषांसाठी खुले ......!!!!! सरपंच पदी आता महिला ऐवजी पुरुषांना संधी

Image
कोपरगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी सरपंच  आरक्षण सोडत काढण्यात आली. यात  तिळवणी, मढी खुर्द  व येसगाव    तीन गावाच्या सरपंच आरक्षणानुसार निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला होता.शासन आता या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलणार का?  या प्रवर्गातील स्त्री उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे.याकडे सर्वांचे लक्ष लागून होते .मात्र जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार या तीनही गावच्या सरपंच  पदाचे आरक्षण जाती व जमातीसाठी खुले करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार तथा तात्कालीन निवडणूक निर्णय आयोग प्रधिकृत अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली. सोयीचे आरक्षण न निघाल्याने निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे मनसुबे उधळले गेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तिळवणी, मढी खुर्द या दोन ग्रामपंचायतीच्या ठिकाणी  अनुसूचित जाती महिला राखीव ठेवण्यात आले होते,या ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी एकही प्रभाग आरक्षित नव्हता, त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला सदस्य नाही.  तर येसगाव ग्रामपंचायत

कोपरगाव नगरपालिकेचे ४५ लाखाचे लाख शिलकीचे अंदाजपत्रक

Image
  नागरिकांना दिलासा कुठलीही करवाढ नाही   कोपरगाव: प्रत्यक्ष करवाढ नसलेले, कोणत्याही आणि नव्या प्रकल्पांची घोषणा टाळून आधीची कामे पूर्ण करण्यावर भर देणारे कोपरगाव नगर पालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे २२१ कोटी ३० लाख ,१६ हजार २१३ (केंद्रीय योजनांसह) ४५ लाख ७१ हजार २१३/- इतक्या शिल्लकेचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गुरुवारी २५ रोजी सभागृहाला सादर केले. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या विविध घोषणा आणि विकासाचे दावेच पुन्हा नव्याने करण्यात आले आहेत.  कोपरगाव नगरपालिकेच्या खर्चाच्या मानाने महसूल उत्पन्न कमी असल्याने ते वाढविण्यासाठी नागरिकांवर कराचा कुठलाही बोजा न टाकता बसून उत्पन्न वाढविण्यासाठी पार्किंग जाहिरात आधीचे नवीन नवीन योजना मांडण्यात आले आहेत. कोपरगांव नगरपरिषदेने  ४५लाख ७१ हजार २१३ रूपये  इतक्या शिल्लकेचे अंदाजपत्रक सादर केले असून यात महसुली व भांडवली जमा १९१कोटी ११लाख ,५६ हजार रुपये अपेक्षित ठेवले असून मागील वर्षीय शिल्लक लक्षात घेता २२१ कोटी ३० लाख ,१६ हजार २१३/- रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चास अनुमती दिलेली आहे. यात कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्त वेतनाचा खर्च

पुरुषोत्तम को-हाळकर यांचे निधन

Image
कोपरगाव प्रतिनिधी ब्राह्मण समाजाचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम गोविंद को-हाळकर  वय 86 यांचे  वृद्धापकाळाने   निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा दोन मुली नातू पणतू  असा  परीवार आहे. येथील श्री गो विद्यालयाचे मुख्याध्यापक  मकरंद  को-हाळकर यांचे ते वडील होत  त्यांच्या निधना बद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक  शिक्षक  शिक्षण  महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,तसेच  आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे  ,नगराध्यक्ष विजय वहाडणे,साईबाबा संस्थान चे माजी विश्वस्त बिपीन कोल्हे ,माजी नगराध्यक्ष संजय सातभाईआदिनी दुःख व्यक्त करुन श्रध्दांजली वाहली . 

संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात साजरा........... मराठीच्या अभ्याासिका प्रा. शिला गाडेे व कवी राम थोरे यांचेकडून विध्यार्थ्यांचे कौतुक

Image
  संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. गाडे, श्री. थोरे आदी दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन करताना. कोपरगांव : दरवर्षी  प्रमाणे संजीवनी अकॅडमी मध्ये मराठी गौरव दिन मोठ्याा उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसूमाग्रजांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरूवात मराठी स्वागत गीताने झाली तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, मराठी भाषेच्या  गाढ्या  अभ्यासिका प्रा. शिला गाडे व प्रसिध्द कवी श्री. राम थोरे यांचे हस्ते सरस्वती पुजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम उपस्थित होत्या.   या प्रसंगी प्रा. गाडे म्हणाल्या की मराठी भाषेच्या  अनेक उपभाषा  आहेत व या द्वारे मराठी भाषा  जतन केली जात आहे. मराठी भाषेचा  दैनंदिन जीवनात जाणिवपुर्वक उपयोग करून तिचे संवर्धन करणे आवश्यक  आहे. आपणच आपल्या भाषेचा  अभिमान ठेवणे गरजेचे आहे. कवी श्री राम थोरे यांनी विध्यार्थ्यांनी  सादर केलेल्या कवितांचे व भाषणांचे कौतुक केले. त्यांच्या  काही निवडक कवितांचे वाचन करून ते म्हणाले की मातृभाषेचे  ज्ञान प्रत्येकाला अ

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी - विवेक कोल्हे

  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ७ नंबर फॉर्म भरून द्यावेत कोपरगाव-  गेल्यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले त्यामुळे दारणा गंगापूर धरणे तुडुंब भरले आहे त्या भरोशावर शेतकऱ्यांनी रब्बी उन्हाळी पिकांचे नियोजन केले, पण वीज वितरण कंपनीने ऐन मोसमात रोहित्र बंद केली तर दुसरीकडे जलसंपदा खात्याने आधी थकित पाणीपट्टी भरा मगच पाटपाण्यांचे नियोजनाचे पाहु असा सुर घेतल्याने शेतकरी पेचात सापडला आहे. गोदावरी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीचा फार्स करण्यात आला पण रब्बी पाटपाण्याचे नियोजन न जमल्याने शेतकरी त्यात भरडला गेला परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तेव्हा जलसंपदा खात्याने थकीत पाणीपट्टी माफ करावी व शेतकऱ्यांचे 7 नंबर फॉर्म स्वीकारावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे विवेक कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले अशाही परिस्थितीत शेतकरी राजाने कर्ज काढून उन्हाळ व रब्बी पिकांचे नियोजन केले मात्र पिके ऐन मोसमात असताना महाविकास आघाडी शासनाने त्यांच्यावर वीज बिलाचा वरवंटा फिरवत अचानक रोहित

आम्मा असोसिएशन तर्फे १० पी जी आर उत्पादने नोंदणी प्रक्रिया सुरु !

Image
कोपरगाव प्रतिनिधी केंद्र सरकारने पी जी आर नोंदणी प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर करून त्याचे फर्टीलायझर कंट्रोल कायदा ८५ मधे रूपांतर केले. त्यामुळे लघु उद्योजकांना मोठा दिलासा दिला. या पार्श्वभूमीवर आज आम्मा असोसिएशन मार्फत निवडक १० उत्पादने नोंदणीसाठी निश्चित कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना आवाहन असोसिएशन तर्फे डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे अध्यक्ष आम्मा ,उपाध्यक्ष डॉ रामनाथ जगताप,सेक्रेटरी प्रशांत धारणकर  ,संचालक लक्ष्मण डोळे यांनी जाहीर केले. देशात लघुउद्योग  क्षेत्रातील उद्योजक मोठ्या प्रमाणात असून त्यांनी उच्च दर्जाचं संशोधन केले आहे जे नोंदणीच्या प्रतिक्षेत होती. या उत्पादनांना राजमान्यता मिळाल्यांनतर शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीचा मार्ग मोकळा होत आहे.  या बदलाने नवीन स्टार्टअपला चालना मिळून उद्योजकता विकास होईल व सरकारच्या धोरणाला गती हि मिळेल. उत्पादन वाढीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तसेच लघु उद्योगामध्ये पी जी आर उत्पादने जागतिक पातळीवर पोहचून भारत त्याचे हब म्हणून लवकरच ओळख निर्माण करेल , असे मत डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी व्यक

महिलाप्रधान एजंटचे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी................ पोस्टल संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार

Image
  महिला प्रधान एजंट यांचेकडून आयोजित पोस्टल संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रसंगी बोलताना नुतन विभागीय सचिव श्री संदीप कोकाटे समवेत संतोष यादव अजित रायकवाड अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर शाखेच्या कार्याध्यक्षपदी  अहमदनगर आर एस पोस्टऑफिसचे सबपोस्ट मास्तर श्री संतोष यादव तर विभागीय सचिवपदी आनंदीबाजार पोस्टऑफिसचे सबपोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे यांची निवड झालेबदल आनंदीबाजार पोस्टऑफिसच्या महिला प्रधान एजंट यांचे तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अल्पबचत संघटनेचे अध्यक्ष श्री उदय गंधे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ महिला प्रधान एजंट श्रीमती स्मिताताई फडके यांनी केले त्यानी आपल्या भावना  कवितेतून व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी  पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव बोलताना म्हणाले की, महिला प्रधान एजंट या डाक विभागाचे अविभाज्य घटक असून त्याचेकडून समाजामध्ये डाक विभागाचे अनमोल काम होत असून समाजातील  सर्व घटकांना बचतीची सवय लावत,घरोघरी जाऊन त्याची बचत जमा करत ती  पोस्टऑफिसच्या अल्पबचत योजनेत त्याचेद्वारे गुंतवणूक होत आह

कोपरगाव तालुका शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव  : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना, मतदारसंघातील तालुका पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना नेते,खासदार सदाशिव लोखंडे , अहमदनगर विभागीय संपर्कप्रमुख नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेना व शेतकरी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी एका पत्रकाव्दारे दिली. पद,नाव आणि कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे- शिवसेना उपतालुकाप्रमुख- रंगनाथ सोपान गव्हाणे, बाळासाहेब रखमाजी राऊत, बाळासाहेब बबनराव मापारी, राजेंद्र बाबुराव नाजगड, बाबासाहेब मारुती बढे, अशोक कर्णासाहेब पवार , शिवसेना तालुका संघटक - राहुल काशिनाथ होन, शिवसेना तालुका कोषाध्यक्ष- संजय काशिनाथ दंडवते, शिवसेना तालुका सचिव- अशोक सुखदेव कानडे, शिवसेना विभाग प्रमुख (पूर्व) दीपक प्रकाश चौधरी, (दक्षिण) गणेश

शिवबाई जाधव यांचे निधन

Image
राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील माजी सरपंच शिवबाई उदयपाल जाधव वय 76 यांचे निधन झाले.   त्यांच्या मागे पती, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे.  कै. शिवबाई जाधव ह्या सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते यांच्या सासू तर संक्रापूर गावचे पोलीस पाटील उदयपाल जाधव यांच्या पत्नी होत.......

लायन्स क्लब ऑफ निफाड व लायन्स क्लब ऑफ कोळपेवाडी ची अधिकृत घोषणा

Image
  कोपरगाव प्रतिनिधी लायन्स क्लब च्या कोपरगावात नव्यानेच सुरू झालेल्या कातकडे परिवाराच्या चॅरिटेबल संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या हॉल मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत लायन्स क्लब ऑफ निफाड ,(चार्टर प्रेसिडेंट ला.सौ.जयश्री भटेवरा) व लायन्स क्लब ऑफ कोळपेवाडी (चार्टर प्रेसिडेंट म्हणून ला..मयूर सारडा) यांची निवड मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आल्याचे .सत्येन मुंदडा यांनी सांगितले. लायन्स क्लब कोपरगाव च्या लायन्स डायलिसिस सेंटर च्या उदघाटन प्रसंगी प्रांतपाल ला अभय शास्त्री व कॅबिनेट सेक्रेटरी  परमानंद शर्मा यांनी क्लब अध्यक्ष . सुधीर डागा व .मनोज कडू यांना  सेवकार्याबद्दल सन्मानपत्र देऊन क्लब च्या संदीप रोहमारे , संदीप कोयटे , राजेश ठोळे , शैलेंद्र बनसोडे , अभिजित आचार्य , डॉ उंबरकर ,राम थोरे , आनंद ठोळे व सर्व सदस्यांचे तोंडभरून कौतुक केले .  कोपरगाव लायन्स क्लब ने आत्तापर्यंत ९ कायमस्वरूपी प्रकल्प उभारून गरजवंतांच्या सेवा करून सम्पूर्ण प्रांतात नावलौकिक मिळवला असल्याचे सांगून ला.  .राजेंद्र शिरोडे , बाबा खुबाणी , लायनेस किरण डागा , लिओ रोहित पटेल यांचे सह सर्व सदस्यांचे योगदानाबद्दल विशेष आभा

लायन्स डायलिसिस सेंटर चे उदघाटन उत्साहात संपन्न

Image
  कोपरगाव प्रतिनिधी नव्याने सुरू झालेल्या येशील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल  लायन्स डायलिसिस सेंटरचे उदघाटन लायन्स डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल  अभय  शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी व्यासपीठावर परमानंद शर्मा , आय.एम.ए. कोपरगाव चे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र गोंधळी , निमा चे अध्यक्ष डॉक्टर नितीन झवर , हॉस्पिटलचे संचालक  चांगदेव कातकडे , प्रसाद कातकडे तसेच लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष  सत्येन मुंदडा , लायन्स क्लब चे अध्यक्ष सुधीर डागा, लायनेस क्लब च्या अध्यक्षा  सौ किरण  डागा, लिओ क्लब चे अध्यक्ष  रोहित पटेल ,डॉक्टर अभिजित आचार्य आदी उपस्थित होते     या सेंटरमुळे गरजू रुग्णांना फायदा होणार असून आता त्यांना डायलिसिस उपचारासाठी बाहेर गावी जाण्याची गरज पडणार नाही . कोपरगाव येथेच अगदी सवलतीच्या दरात  चांगले उपचार मिळणार आहेत . गरजूंनी  लायन्स क्लब च्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन   सत्यम मुंदडा  यांनी केले    डॉक्टर महेंद्र गोंधळी व डॉक्टर  नितीन झंवर यांनी लायन्स च्या सेवा कार्याचे कौतुक केले व या डायलिसिस सेंटर ची उपयुक्तता सांगितले     लायन्स चे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी आपल्या उद

विष्णुपंत कुलकर्णी यांचे निधन

Image
  कोपरगाव प्रतिनिधी ब्राम्हण समाजाची जेष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत कृष्णाजी कुलकर्णी व 78 यांचे  नाशिक येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले पत्नी नातू असा परिवार आहे कै विष्णुपंत कुलकर्णी यांच्यावर नाशिक येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले येथील किराणा व्यापारी अजय कुलकर्णी यांचे ते वडील होत.

एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन सहज शक्य_ खंडागळे

Image
  कोपरगाव :  एकात्मिक ऊस व्यवस्थापन  पद्धतीचा अवलंब, बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बीजप्रक्रिया, लागवड, खत, तण आणि जल व्यवस्थापन याबाबतचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना सहज एकरी 100 मेट्रिक टनापर्यंत उसाचे उत्पादन घेता येते असा विश्वास निफाड कृषी संशोधन केंद्राचे कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे यांनी व्यक्त केला.             राष्ट्रीय अन्नसुरक्षा व्यापारी पिके ऊस विकास अभियानाअंतर्गत तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी परिसरातील पांडुरंग लोंढे यांच्या शेतावर शेतकरी दिन व शिवार भेट कार्यक्रम बुधवारी कोरोना संसर्ग सामाजिक अंतराचे भान राखत  सर्व नियमांचे  पालन करून आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.           प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोकराव आढाव यांनी शासनाच्या विविध कृषी योजना व सोयाबीन, कांदा पिका बाबतचे व्यापारी धोरण व शाश्वत  शेतीतून कृषी विकास कसा साधायचा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी ऊस पिकात कांदा व इतर आंतरपिके कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन केले.   कोपरगाव बाजार समितीचे सभापती स

निराधारांच्या खात्यावर थेट १ काेटी २० लाख

Image
  कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यात निराधारांची संख्या मोठी आहे. अपत्य नसलेले, वारसदारांनी त्याग केलेले, आधारहीनतेच्या चक्रात अडकलेल्या निराधारांना दिलासा देण्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन, अशा पाच योजना कार्यान्वित आहेत. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार सौ. एम. एस. गोरे  यांनी दिली.  समाजातील आधारहीन लोकांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा, आयुष्याच्या उतारवयात त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने तालुक्यातील ५ हजार १९७ विधवा, दिव्यांग, वृद्ध निराधारांच्या खात्यावर तीन महिन्यांचे १ कोटी २० लाख २८ हजार २०० रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्ये दिलासा म्हणून केंद्र सरकारने योजनेतील ७४२ निराधारांना एक हजार रुपयाप्रमाणे ७ लाख ४२ हजार सानुग्रह अनुदानही दिले होते . त्यामुळे सरकारकडून मिळालेले १ कोटी २० लाख २८ हजारांचे २०० रूपये अनुदान तालुक्यातील निराधारांसाठी आधाराची काठी ठरली आहे. त्यात निकषांत बसणाऱ्या लाभार

सौ.अनुराधा जाधव यांचे निधन

Image
कोपरगाव : जेऊरपाटोदा धारणगांव परिसरातील सौ.अनुराधा जयवंत जाधव  (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे  यांची ती बहीण  होती. कोपरगाव शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी (२१) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागेल तिथे नाही, तर पालिकेच्या मालकी जागेवरच खोका शॉप ला परवानगी मिळेल --- मा.सहाय्यक संचालकाकडून शिष्टमंडळाला स्पष्ट उत्तर

Image
  बाजारतळातील खोका शॉपसाठी  केवळ औपचारिकता बाकी कोपरगाव : काँग्रेस कमिटी जवळ,धारणगाव रोड,पुनम थिएटर समोर,एस.जी.विद्यालय भिंतीलगत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, टिळक नगर शॉपिंग जवळ,येवला रोड,बुब हॉस्पिटल जवळ इ.ठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी द्यावी अशी मागणी बुधवारी 24 रोजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह शिष्टमंडळाने मा.सहाय्यक संचालक, नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग, अहमदनगर यांच्याकडे केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात मागेल तिथे नाही तर पालिकेच्या मालकी जागेवरच खोका शॉप ला परवानगी मिळेल असे उत्तर दिले असल्याची माहिती खुद्द नगराध्यक्ष विजय वहाडणे  यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.  तर बाजारतळ येथे खोका शॉपसाठी मान्यतेची केवळ औपचारिकता उरलेली आहे , असेही ते म्हणाले,  नगर येथे झालेल्या बैठकीत शहरातील सुशिक्षित-अशिक्षित बेरोजगार, छोट्या व्यावसायिकांना, विस्थापितांना जास्तीतजास्त खोका शॉप उपलब्ध व्हावेत यासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष निखाडे,संदिप वर्पे, मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,मंदार पहाडे,कैलास जाधव,विनायक गायकवाड व सहकारी, क

पोलीस निरीक्षक गवळी गेले, देसले आले

Image
  कोपरगाव : कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची  अवघ्या  दोन अडीच महिन्यात  बदली झाली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे शहर पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळणार आहेत. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे   शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा व्यवस्थेचा कार्यभार राहणार असल्याची माहिती कळते . पो.नि.राकेश माणगावकर यांची बदली कोतवाली पोलीस ठाणे येथे दि.११ नोहेंबर रोजी झाली होती. त्यानंतर  २९ नोहेंबर रोजी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतला होता.     अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे.

श्रीं चे दर्शनाकरीता आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे.........

Image
  शिर्डी - राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. सध्‍या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात प्रवेश करताना यापुर्वी करण्‍यात आलेले नियम नेहमीप्रमाणे सुरु राहतील. तसेच श्रीं च्‍या दर्शनाकरीता साधारणपणे १५००० भाविकांना दर्शन देता येईल. त्‍यामुळे साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे ,  असे नम्र आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था ,  शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आलेले आहे. दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी  काही अटी/शर्तींवर  खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सध्‍या  कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात  घेवुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्‍याअनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी

पुणे येथील हॉर्स रायडिंग स्पर्धेत ‘राजस्व’चे दैदिप्यमान यश ; 10 पदकांची कमाई..........

Image
 अहमदनगर :  येथील धर्माधिकारी मळा भागातील राजस्व हॉर्स रायडिंग क्लबच्या सदस्यांनी नेत्रदीपक यश मिळवून नगरचा नावलौकिक वाढविला. या क्लबचे प्रसाद भणगे, विजय जाधव, श्रीकांत शिंदे, मनाली जासूद, सुशांत तरवडे, अक्षर बुरगुल, विराज पारखे, सिद्धार्थ भिंगारदिवे, मयूर बेद्रे, हिंदवी पेटकर, श्रमाली लोळगे आदींनी विविध अश्‍व स्पर्धेमध्ये यश मिळवून पदक प्राप्त केले. पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र इक्वेस्ट्रियन असोसिएशनअंतर्गत जॅपलुप इक्वेस्ट्रियन सेेंटर प्रा. लि., पुणे यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथे 4 ते 7 फेबु्रवारीदरम्यान वार्षिक इक्वेस्ट्रियन गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा बिगीतर, कन्फाईन, अ‍ॅमेचर, ज्युनिअर, ओपन अशा विविध गटांमध्ये घेण्यात आल्या. गेम्समध्ये ड्रसाज, शो-जंपिंग, पोलबेंडींग, ट्रॉटींग रेस, शो-जंपिंग, नॉर्मल, शो-जंपिंग रिले, शो-जंपिंग टॉप स्कोअर, हॅट रेस, बॉल अ‍ॅण्ड बकेट रेस यामध्ये समाविष्ट असतात.  या खेळांमध्ये लहान मुलांपासून म्हणजेच 7 वर्षे ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात. असे खेळ फक्त परदेशात खेळले जातात. आता ते आपल्याकडेही होतात. इं

टपाल कर्मचाऱ्यांच्या न्याय व प्रलंबित प्रश्नावर पाठपुरावा सुरूच ...श्री राहाटे यांचे प्रतिपादन

Image
  अहमदनगर: टपाल कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याविषयी संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला जात आहे शांत बसून किंवा नुसते बोलून समस्या सुटणार नाहीत त्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन नॅशनल  फेडरेशन  पोस्टल एम्प्लॉईजचे  माजी सेक्रेटरी जनरल मा श्री टी एन राहाटे यांनी केले. संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी श्री संतोष यादव, आर एच गुप्ता, बी एस  शिंदे,आर एच लांडगे,के एस पारखी,डी आर देवकर,पी एस शिंदे,एस डी जावळे आदी उपस्थित होते.      संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासोबतच  त्याच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन त्यानी या वेळी दिले.         संघटना ही सभासदाचे हित जपण्यासाठी असते.  एकमेकांचे उणेदुणे काढण्यासाठी संघटना नसते त्यामुळे सभासदांनी संघटित राहावे असे आवाहन श्री संतोष यादव यांनी केले. यावेळी पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी श्री शिवाजी जावळे,कार्याध्यक्षपदी संतोष यादव तर विभागीय सचिवपदी श्री संदीप कोकाटे यांची तर पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी श्री नामदेव डेंगळे,विभागीय सचि

संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये शिव जयंती उत्साहात साजरी...... छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचे काम अविरत सुरु ठेवावे - पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव.......

Image
  कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांची जयंती जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत, पोवाडे, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य नाटक असे विविध कार्यक्रम आयोजन करुन संजीवानी इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.   कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे मॕनेजिंग ट्रस्टी . रेणुका कोल्हे, स्कुलचे अॕकडमीक हेड हरीभाऊ नळे, प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन शालेय विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यकामाचे प्रास्तविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय शालेय विद्यार्थी आर्या देशमुख यांनी केलतर सुञसंचालन हिमांशु बाविस्कर, उत्सवी देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे आभार शिवानी वल्टे यांनी केले. संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे वतीने मॕनेजिंग ट्रस्टी. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यां

प्रा. साहेबराव दवंगे यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कारने गौरव

Image
वैजापुर येथे प्रा. साहेबराव दवंगे यांना  छत्रपती शिवाजी  महाराज राष्ट्रीय  पुरस्कार बहाल करताना आमदार  रमेश  बोरणारे, सारा फाऊंडेशन, ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रविण महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी  सम्राटसिंह राजपुत.   कोपरगांव प्रतिनिधी येथील संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे यांना वैजापुर येथिल जिजाऊ बहुउध्देशिय  सेवाभावी संस्थेने त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रदिर्घ सेवेची दखल घेवुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय  पुरस्कारने नुकतेच सन्मानीत केले. सदरचा पुरस्कार वैजापुरचे आमदार  रमेश  बोरणारे, सारा फाऊंडेशन, ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रविण महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी  सम्राटसिंह राजपुत यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा नुकताच वैजापुर येथिल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर वरील मान्यवरांसह उपजिल्हाधिकारी  माणिक आहेर, माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद , औरंगाबादचे अॅड. प्रमोद जगताप, माजी सभापती, पंचायत समिती, वैजापुरचे बाबासाहेब जगताप, माजी नगराध्यक्ष, वैजापु

कोपरगाव शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

Image
  कोपरगाव प्रतिनिधी शहरात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फटाक्यांची आतिषबाजी करत तुतारींची सलामी देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीप्रारंभी पहाटे नगरपालिकेच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,नगरसेवक अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते सपत्नीक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अभिषेक पूजा करण्यात येवून आरती करण्यात आली यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक या अभिषेक पूजनास उपस्थित होते.तसेच यावेळी आमदार आशुतोष काळे युवक नेते विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भाजप-शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई भगवे झेंडे पताका आदींनी सजविण्यात आले होते तरुण-तरुणी आकर्षक पेहराव करून मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांचा यावेळी जय जय कार करण्यात आ

निवारा मित्र मंडळाच्या वतीने एक लाखाचे फवारणी यंत्राचे लोकार्पण........ शिवजयंती निमित्त उपक्रम.......

Image
  कोपरगाव प्रतिनिधी सामाजिक उपक्रमांतर्गत नवरात्र उत्सवातील वाचलेल्या खर्चाचा  सदुपयोग करून एक लाख रुपये खर्चाचे फवारणी मशीन खरेदी करून येथील साई निवारा मित्र मंडळ  यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, येवला रोड, आढाव वस्ती, साई-सिटी, सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी, शंकरनगर, ओमनगर आदि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणेसाठी रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष , निवारा हौसिंग सोसायटीचे संस्थापक   ओमप्रकाश  तथा काका कोयटे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ सुहासिनी  कोयटे  उपनगराध्यक्ष  स्वप्निल निखाडे अमृत संजीवनी चे अध्यक्ष  पराग संधान शिवसेना गटनेते योगेश बागुल माजी नगरसेवक बबलू वाणी विनोद राक्षे नगरसेवक संजय पवार वैभव गिरमे सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई शेख निसर भाई शेख  लक्ष्मीनारायण भट्टड निवारा सोसायटीचे माजी अध्यक्ष स