कोरोना लसीकरण शुभारंभ
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाने कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात कोव्हीड सेंटर येथे पुरविलेली सेवा कौतुकास्पद असून यापुढेही रुग्णसेवेचा हा वसा असाच अविरत सुरु राहील असे प्रतिपादन कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले.
श्री साईबाबा संस्थानच्या साई धर्मशाळा येथे गुरुवार दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रमोद मस्के, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.विजय नरोडे, परिचारीका व कर्मचारी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी संस्थानच्या कोरोना सेंटर येथे सेवा दिलेल्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, वार्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांचे अभिनंदन करुन रुग्णालयाकडून रुग्णसेवेचा वसा असाच यापुढेही सुरु राहील अशी भावना व्यक्त केली. तसेच लसीकरणाचा शुभारंभ ही आनंदाची बाब असली तरी यापुढील काळातही खबरदारी म्हणून मास्क, सॅनिटायझर यांचा वापर सुरू ठेऊन सामाजीक अंतराचे पालन करणे ही आपली जबाबदरारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे यांनी प्रस्ताविकात कोरोणाच्या प्रादुर्भावात संस्थान मार्फत केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन संस्थानच्या कोरोना सेंटरचा आजतागायत ४४५० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. श्री साईबाबा व साईनाथ रुग्णालयातील तसेच कोविड काळात कोविड सेंटर येथे काम केलेल्या कोविड योध्यांना कोरोना विषाणू वरील कोविड शिल्ड हि लस देण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारीका, वॉर्ड बॉय, आया, रुग्णवाहीका चालक व स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश असणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment