रवंदे ते टाकळी रस्त्यासाठी मिळालेल्या मंजुरीचा श्रेय लाटु नका - वैशाली सांळुके......... स्नेहलता कोल्हे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
कोपरगाव प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघातील गेल्या १० वर्षापासुन रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळालाच नाही. रवंदे व टाकळी परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांनी यांच्या कार्यकाळात शासनदरबारी सतत पाठपुरावा करुन २०१९-२०२० मधील अर्थसंकल्पात हा रस्ता मंजुर करुन घेतला होता. त्याचे श्रेय मात्र दुसरेच लुटत आहे ते घेण्याची तसदी घेऊ नये अशी टिका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वैशाली सांळुके यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून त्यांनी म्हटले की रस्ते विकासाचा अनुशेष व रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा यासाठी कोल्हे यांनी मतदारसंघातील अनेक रस्त्यांना मंजुरी आणली त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले याचे बहुतांशी नागरिक साक्षीदार आहेत. कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा ५) च्या रवंदे ते टाकळी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणा-या शालेय विद्यार्थी,दुध उत्पादक व शेतकरी तसेच मोर्वीस, धामोरी, मायगांवदेवी, सांगवीभुसार, रवंदे, टाकळी या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या ०५ कि.मी. खराब रस्त्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले. हा रस्ता म्हणजे एकप्रकारचा मृत्युचा सापळा अशी परिस्थिती झालेली होती. ही सर्वप्रकारची परिस्थिती लक्षात कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते वाहतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच या पाच किलोमीटरच्या रस्त्यांला निधी मिळाला आहे, जे शक्य नाही ते फक्त सौ. कोल्हे यांनी शक्य करुन दाखविले आहे. यासाठी इतरांनी कोणीही श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये असा सल्ला देखील सौ. सांळुके यांनी दिला आहे. या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्द रवंदे टाकळी परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले आहे.
Comments
Post a Comment