जागतिक पातळीवरील स्पर्धेत कुलदिप ने मिळविला तृतीय क्रमांक

 


कोपरगांव-

 समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने क्रेयॉन

विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेतील टॉप टेन मध्ये स्थान

मिळविलेल्या स्पर्धकांमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा (personality contest) या प्रकारात कला

गुण सादर करत तृतीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा

बर्धन यांनी दिली.

या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उपप्राचार्य श्री विलास भागडे

म्हणाले कि, ‘क्रेयॉन विझकिड्स हि एक जागतिक स्थरावरील नामांकित संस्था असून या

संस्थेतर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मागील २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले

जाते. या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात हि स्पर्धा राष्ट्रीय आंतर

शालेय असून विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपले उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते.

विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतर शालेय ते राष्ट्रीयस्तरांपर्यंत मजल मारावी लागते.

या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते.

क्रेयॉन विझकिड्स दरवर्षी जागतिक स्तरावर स्पर्धांचे आयोजन करते. त्यामध्ये संगीत,

गायन, नृत्य, वक्तृत्व, सृजनशील लिखाण, अभिनय व्यक्तिमत्व या स्पर्धांचा समावेश होतो.

कुलदिप ची स्पर्धा ‘व्यक्तिमत्व स्पर्धा’ (personality contest) या प्रकारातील

होती. या प्रकाराच्या अनुषंगाने कुलदिप मध्ये असणाऱ्या शालेय शिक्षणा बरोबरच अंगभूत

कला गुणांची दखल घेतली गेली. यामध्ये कुलदीप चे अभिनय कौशल्य, जतन केलेले छंद,

आवड-निवड, स्वभाव, संभाषण कौशल्ये तसेच समता लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष

म्हणून राबविलेल्या सामाजिक मोहिमा,पथनाट्ये सादरीकरण, अभिनयाचे उत्कृष्ट

सादरीकरण व वक्तृत्वावर असलेली पकड, संगीत कलेतील गिटार वाजविण्याची कला

यांचा समावेश होतो.

या स्पर्धांमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा (personality contest) या स्पर्धेचा अतिशय

काठीण्यपूर्ण दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो कारण यामध्ये स्पर्धकास कमीत कमी वेळेत

आपल्या अंगभूत कलांचा अविष्कार करावा लागतो. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीपर्यंत

जाण्यासाठी खूप खडतर पायऱ्या पार पाडाव्या लागतात. ज्यामध्ये सर्वसाधारण फेरी,

वैयक्तिक फेरी, सादरीकरण, मुलाखत (Interview) फेरी आणि अंतिम फेरी आदि

फेऱ्यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांसमोर कला-गुणांचे सादरीकरण करत

कुलदिप कोयटे याने कोपरगाव सारख्या तालुक्याबरोबरच जिल्हा, राज्य, देशाचे नेतृत्व केले

होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्टार स्पोर्ट्सचे होस्ट संजना गणेशन, बंगलोर येथील आस्था


सोनी (Architect),डेक्सीरीटी ग्लोबल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद सागर यांनी

काम पाहून कला गुणांमध्ये निपुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. समता समता

इंटरनॅशनल स्कूलचे व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शक श्री समीर आत्तार, श्री.मयूर पेटकर

यांच्यासह समतातील शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, समता नागरी सहकारी

पतसंस्थेचे चेअरमन, समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा

काका कोयटे यांचा नातू, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप

कोयटे व विश्वस्त श्री संदीप ओमप्रकाश कोयटे यांचा सुपुत्र आहेत.

या यशाबद्दल समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता भरत

अजमेरे, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. सुधीर डागा, सचिव

श्री.प्रदीप साखरे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार

बंब, एसएसके वारड्रोबेच्या संस्थापिका सौ.सिमरन खुबाणी, सौ.शालिनी खुबाणी, समता

इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्कूलच्या प्राचार्य सौ.लिसा बर्धन,

उपप्राचार्य श्री.विलास भागडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून

अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा