के.जे. सोमैया महाविद्यालयात संयुक्त पूर्व परीक्षा मार्गदर्शन वेबीनार संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षा या ग्रामीण  भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रयत्न व सातत्य यांची कसोटी पाहतात. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना गोंधळून न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत"* असे प्रतिपादन उपनिरीक्षक  रूपाली भगत यांनी एक दिवसीय वेबिनार मध्ये केले. के.जे. सोमैया महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग,अंतर्गत गुणवत्ता कक्ष व पिरॅमिड ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने "पीएसआय /एसटीआय/ असिस्टंट पूर्व परीक्षांची तयारी" या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले. त्यात भगत यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  मार्गदर्शन सत्र मध्ये महाविद्यालयातील व परिसरातील एकूण 192 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर त्यात 76 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. *"के. जे. सोमैया महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध कार्यशाळा घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य दिशा दर्शवते"* असे महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.बी.एस.यादव यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. याप्रसंगी  पिरॅमिड ॲकॅडमीचे अध्यक्ष . विकास मालकर व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संतोष पगारे उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके यांनी  आपल्या प्रास्ताविकात फेब्रुवारी महिन्यात महाविद्यालयात नेट/सेट कार्यशाळा आयोजित करण्यात आहे त्याचा पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.रवींद्र जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. विजय ठाणगे, कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे, ग्रंथपाल निता शिंदे, प्रा.आकाश सोनवणे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . अशोकराव रोहमारे व सचिव अँड..संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा