साखरवाडीच्या वैभवाचे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
कोपरगाव प्रतिनिधी
सन 1970 ते 1985 पर्यंतचा तो काळ अतिशय सुवर्णकाळ होता सर्वत्र आबादीआबाद असे वातावरण होते तालुक्यात साखरवाडी करमसी भाई सोमय्या शांतीलाल सोमय्यायांच्या मालकीचा येथे राज्यातील एक नंबरचा खासगी साखर कारखाना येथे होता या साखर कारखान्यात रेल्वेने ऊस आणला जायचा अगदी भरभराटीचे दिवस होते ते असे येथील खानेसुमारी पाहणारे चाळीस वर्षापासून चे स्वयंपाकी मूळचे राजस्थानचे मिठालाल कुंभार सांगत होते त्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कालखंडातील आठवणींना उजाळा दिला व साखरवाडीच्या असलेल्या भरभराटी बाबत मत व्यक्त केले ते म्हणाले मी 78 साली येथे स्वयंपाकी म्हणून रुजू झालो त्यावेळी रिटायर आर्मी ऑफिसर म्हणून गोपाळ शेट्टी त्यानंतर जनरल मॅनेजर बी एल कपूर जे एन पटेल पी के आर नायर जीएम कजारिया हे होते आता संचालक एस मोहन आहेत सन 1970 ते 1985 दरम्यान शिर्डीला साई दर्शनासाठी त्याकाळी येणारे अनेक मोठमोठे राजकारणी अभिनेते-अभिनेत्री नट्या अनेक कलाकार साखरवाडी ला आवर्जून भेट देत असत त्यात प्रामुख्याने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री हरिदेव जोशी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन मनिषा कोईराला डॉक्टर श्रीराम लागू कानन कौशल काशिनाथ घाणेकर प्रकाश इनामदार निळूफूले मधू कांबीकर आशालता मुंबईचे उद्योगपती तात्कालीन राजकारणातील मातब्बर मधु दंडवते दत्ता सामंत नामजोशी एस एम जोशी बापू काळदाते साथी किशोर पवार आधी मोठी मंडळी येथे येऊन गेली आहेत परिसरासाठी देव माणूस म्हणून ओळखले जाणारे शांतीलाल जी सोमय्या खऱ्या अर्थाने देवदूत होते त्यांचा वारसा समीर भाई सोमय्या आज कसोशीने चालवत आहेत सन 1982 झाली येथे गंगागिरी महाराजांचा मोठा हरिनाम सप्ताह झाला होता कामगारां साठी चेतना क्लब होते त्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी बॅडमिंटन क्रिकेट व्हॉलीबॉल स्पर्धा येथे भरवल्या जात वर्षातून एकदा भारतभ्रमण सहल नेली जात असेल नवरात्र व गणपती उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे त्याकाळात करमणुकीला कोणतीही साधने नव्हती त्यामुळे येथे गणपती उत्सवात मोठमोठी नामांकित नाटके ठेवली जायची ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी जमत असे 1983 च्या काळात येथे सोमय्या उद्योगसमूहाने अहमदनगर जिल्ह्यात सर्वात प्रथम इंटरनॅशनल टीव्ही डिश येथे बसवली होती त्याकाळी आखाती युद्ध सुरू होते ते
सीएनएन लाईव्ह चैनलवर प्रक्षेपण
पाहण्यासाठी समीर भाई यांचे नातेवाईक साखरवाडी ला आवर्जून येत असत त्याकाळी लोक एकमेकाला मदत करीत सुखदुःखात सामील होत असत तो काळच वेगळा होता आता त्याच्या केवळ आठवणीच राहिल्या आहेत असे सांगताना सोमय्या परिवाराचे योगदान खूप मोठे आहे त्यांनी त्याकाळी दूरदृष्टी ठेवून राज्यातील क्रमांक एकचा साखर कारखाना खासगी पद्धतीने उत्तम रित्या चालून दाखवला होता तो काही कारणास्तव बंद पडला त्यानंतर मात्र रयाच गेली आज या कारखान्यात जवळपास साडेतीनशे कायमस्वरूपी तर अडीचशे कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार गोदावरी रिफायनरी वर आपला जीवन चरित्र अर्थ चालवीत आहेत कारखान्याचे सर्वेसर्वा समीर भाई सोमय्या यांची व्यापक दृष्टी व्यवस्थापन व कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आजही गोदावरी बायो रिफायनरी उत्तम रीत्या सुरु आहे
सोमय्या परिवार हा गोरगरीब जनतेचे सतत हीत पाहत असे कंपनीच्या कामगारांना त्यावेळी अत्यंत माफक दरात कोळसा दूध किराणामाल ते उपलब्ध करून देत असत हे सांगताना स्वयंपाकी मिठालाल कुंभार यांना गहिवरुन आले.
Comments
Post a Comment