अनाथांच्या आईचा देशपातळीवर गौरव - - - कोल्हे
हजारो अनाथ मुलामुलींना आपलेसे करून त्यांच्यावर िक्षण संस्काराचे धडे देऊन घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणार्या अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले त्यांचा देशपातळीवर गौरव होत आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हंटले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सिंधुताई सपकाळ यांना आजवर एक हजाराच्या पुढे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. वर्ध्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी असून आजवर वय वर्षे 74 पर्यंत त्यांचा पद्मश्री पर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे. त्यांच्या नशिबी हलाखीचं जीणआलं ते अनाथांना येऊ नये म्हणून त्यांची सतत धडपड सुरू असते. त्यांच्या कामाचा केंद्र शासनाने योग्य गौरव केला आहे. यामुळे महाराष्ट्रवासियांची शान वाढली आहे. पुरंदरच्या कुंभारवळण येथे त्यांनी 1994मध्ये ममता बाल सदन संस्था स्थापन करून या कार्याला आकार दिला. मदर ग्लोबल फाउडेशनच्या माध्यमातून त्यांची झेप आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे., तर पारधी समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाचा आशेचा किरण दाखवणारे गिरीश प्रभुणे यांनाही केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे, या दोघांचेही संजीवनी उद्योग समूहाचे वतीने अभिनंदन.
Comments
Post a Comment