ब्रह्मलीन संत रामदासी बाबांच्या 31 पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड राम नाम जप
दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठी, तीर्थक्षेत्र कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांचा 31 वा पुण्यतिथी सोहळा कोरोना संसर्ग सर्व नियम पाळून 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्ताने अखंड राम नाम जप साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणiचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ रामदासिबाबा भक्त मंडळ सदस्यांच्या हस्ते शनिवारी 30 जानेवारी रोजी झाला.
गेल्यावर्षी नवरात्र उत्सव सोहळ्याच्या प्रारंभी रामदासी बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून 90 दिवस राम नाम जप संकल्प करण्यात आला होता, त्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातून तसेच देश-विदेशातील भक्त मंडळींनी साथ देत रामनाम जप सुरू केला. या पुण्यतिथी सप्ताह काळात दररोज पहाटे चार ते पाच काकड आरती, सकाळी आठ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, तर 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता कोकमठाण गावातून रामदासी बाबा यांच्या प्रतिमेची मिरवणूक, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता शोभादेवी व शरद रावसाहेब थोरात यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक, सकाळी साडेदहा वाजता आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, खातगाव कर्जतचे समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, श्री. श्री. 1008 गणेशानंद सरस्वती, ब्रह्मचारी शिवभक्त अरविंद महाराज, भागवतiनंद महाराज, आदी संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत, सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने रामदासीबाबा पुण्यतिथी व अखंड रामनाम जप सोहळ्याची सांगता तसेच नेवासा येथील सुप्रसिद्ध चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत यांनी रेखाटलेल्या रामदासीबाबा तलचित्राचे अनावरण होईल, त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात येईल तरी जास्तीत जास्त भाविकांनी राम नाम जप सप्ताहात सहभाग घेऊन संकल्पपूर्तीसाठी सहकार्य करावे असे आवाहन रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाणच्यi वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment