Posts

Showing posts from January, 2021

बारहाते कुटुंबियांचा नवसाला पावणारा चिंतामणी गणपती

Image
  कोपरगाव प्रतिनिधी नागपूर मुंबई द्रुतगती मार्गावरील श्रीक्षेत्र संवत्सर (तालुका- कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर) येथील बारहाते  कुटुंबियांचा नवसाला पावणारा चिंतामणी गणपती अशी ख्याती असून हा गणपती  असलेल्या जमिनी क्षेत्रात पाचशे वर्षापूर्वीचा  गणपती पुरातन मानला जातो.   त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला येथे भाविक आपल्या मनोकामना पूर्ती साठी येतात.            संजीवनी कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव बाराहाते, या चिंतामणी गणपती विषयी माहिती देताना म्हणाले की, आपले आजोबा नानाजी विठोबा बाराहाते हे थोर गणपती भक्त होते. ते नित्यनियमाने गोदावरी नदीचे पाणी आणून पूजाविधी स्नान-संध्या झाल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. गणपती तपश्चर्येने त्यांना दौलतराव व संपतराव ही दोन अपत्ये झाली.  आपले वडील दौलतराव बाराहाते हे देखील गणपती भक्त होते.   पेशवेकालीन पुरातन गणपती मूर्ती असल्याने मन प्रसन्न होते.   आपल्याला जसे समजायला लागले तसं, 1976 सालापासून आपण गणपतीच्या भक्तीत तल्लीन होतो   46 वर्षांपासून या दैवताची पूजा अर्चा आपण करतो. प्रत्येकाचे संकट हरण करण्या चे अनेक अनुभव या चिंतामणी  गणपती ने दिले आहे.        

जागतिक पातळीवरील स्पर्धेत कुलदिप ने मिळविला तृतीय क्रमांक

Image
  कोपरगांव-  समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने क्रेयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेतील टॉप टेन मध्ये स्थान मिळविलेल्या स्पर्धकांमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा (personality contest) या प्रकारात कला गुण सादर करत तृतीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा बर्धन यांनी दिली. या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उपप्राचार्य श्री विलास भागडे म्हणाले कि, ‘क्रेयॉन विझकिड्स हि एक जागतिक स्थरावरील नामांकित संस्था असून या संस्थेतर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मागील २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात हि स्पर्धा राष्ट्रीय आंतर शालेय असून विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपले उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतर शालेय ते राष्ट्रीयस्तरांपर्यंत मजल मारावी लागते. या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते. क्रेयॉन विझकिड्स दरवर्षी जागतिक स्तरावर स्पर्धांचे आयोजन करते. त्यामध्ये संगीत, गायन, नृत्य, वक

ब्रह्मलीन संत रामदासी बाबांच्या 31 पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड राम नाम जप

Image
  दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठी, तीर्थक्षेत्र कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांचा 31 वा पुण्यतिथी सोहळा कोरोना संसर्ग  सर्व नियम पाळून 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्ताने अखंड राम नाम जप साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणiचे आयोजन करण्यात आले आहे.   त्याचा शुभारंभ रामदासिबाबा भक्त मंडळ सदस्यांच्या हस्ते शनिवारी 30 जानेवारी रोजी झाला.          गेल्यावर्षी नवरात्र उत्सव सोहळ्याच्या प्रारंभी रामदासी बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून 90 दिवस राम नाम जप संकल्प करण्यात आला होता,  त्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातून तसेच देश-विदेशातील भक्त मंडळींनी साथ देत रामनाम जप सुरू केला.   या पुण्यतिथी सप्ताह काळात दररोज पहाटे चार ते पाच काकड आरती, सकाळी आठ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, तर 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता कोकमठाण गावातून रामदासी बाबा यांच्या प्रतिमेची मिरवणूक, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता शोभादेवी व शरद रावसाहेब थोरात यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक,  सकाळी साडेदहा वाजता आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद

*कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा-सौ.स्नेहलता यांचा छत्रपती पुरस्काराने सन्मान..!!

Image
  कोपरगाव प्रतिनिधी उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरणासाठी दिला जाणारा छत्रपती पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता  कोल्हे यांना देण्यात आला आहे. या प्रसंगी सौ.रेणुका कोल्हे,सौ.सावित्री कोल्हे,भाजपा महिला पदाधिकारी,नगरसेविका,महिला बचत गटाच्या महिला भगिनी,छत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

रवंदे ते टाकळी रस्त्यासाठी मिळालेल्या मंजुरीचा श्रेय लाटु नका - वैशाली सांळुके......... स्नेहलता कोल्हे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

Image
  कोपरगाव प्रतिनिधी विधानसभा मतदार संघातील गेल्या १० वर्षापासुन रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळालाच नाही.  रवंदे व टाकळी परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव  स्नेहलता  कोल्हे यांनी यांच्या कार्यकाळात शासनदरबारी सतत पाठपुरावा करुन २०१९-२०२० मधील अर्थसंकल्पात हा रस्ता मंजुर करुन घेतला होता. त्याचे श्रेय मात्र दुसरेच लुटत आहे ते घेण्याची तसदी घेऊ नये अशी टिका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वैशाली सांळुके यांनी केली आहे.   प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून त्यांनी म्हटले की रस्ते विकासाचा अनुशेष व रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा यासाठी  कोल्हे यांनी मतदारसंघातील अनेक रस्त्यांना मंजुरी आणली त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले याचे बहुतांशी नागरिक साक्षीदार आहेत. कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा ५) च्या रवंदे ते टाकळी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणा-या शालेय विद्यार्थी,दुध उत्पादक व शेतकरी त

जानकीराम कोताडे यांचे निधन

Image
  कोपरगाव प्रतिनिधी येथील प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते  माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निकटवर्तीय सडे ग्रामपंचायतीचे सरपंच अजित कोताडे यांचे वडील  जानकीराम  कोताडे वय 83 यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले.  त्यांच्या मागे. 2 मुले , 5 मुली नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव. स्नेहलता कोल्हे व कोल्हे  परिवाराने  शोक व्यक्त केला.

के.जे. सोमैया महाविद्यालयात संयुक्त पूर्व परीक्षा मार्गदर्शन वेबीनार संपन्न

  कोपरगाव प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा या ग्रामीण  भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रयत्न व सातत्य यांची कसोटी पाहतात. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना गोंधळून न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत"* असे प्रतिपादन उपनिरीक्षक  रूपाली भगत यांनी एक दिवसीय वेबिनार मध्ये केले. के.जे. सोमैया महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग,अंतर्गत गुणवत्ता कक्ष व पिरॅमिड ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने "पीएसआय /एसटीआय/ असिस्टंट पूर्व परीक्षांची तयारी" या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले. त्यात भगत यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  मार्गदर्शन सत्र मध्ये महाविद्यालयातील व परिसरातील एकूण 192 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर त्यात 76 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. *"के. जे. सोमैया महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध कार्यशाळा घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य दिशा दर्शवते

कोरोना लसीकरण शुभारंभ

Image
  शिर्डी -  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था  ( शिर्डी )  संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाने कोरोना विषाणूच्‍या प्रादूर्भावात कोव्‍हीड सेंटर येथे पुरविलेली सेवा कौतुकास्‍पद असून यापुढेही रुग्‍णसेवेचा हा वसा असाच अविरत सुरु राहील असे प्रतिपादन कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या साई धर्मशाळा येथे गुरुवार दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास संस्‍थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे ,  प्रांताधिकारी गोविंद शिंदे ,  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रमोद मस्‍के ,  प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे ,  दिलीप उगले ,  मुख्‍य अभियंता रघुनाथ आहेर ,  श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे ,  श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे ,  डॉ.विजय नरोडे ,  परिचारीका व कर्मचारी आदि उपस्थित होते. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी संस्‍थानच्‍या कोरोना

कोपरगाव आगारा च्यावतीने तुळजापूर-पंढरपूर-जेजुरी दर्शन यात्रेचे आयोजन

Image
  *खुशखबर    खुशखबर      खुशखबर* भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग *कोपरगाव आगारा* च्यावतीने *दि. २०/०२/२०२१, शनिवारी*  *तुळजापूर-पंढरपूर-जेजुरी*  दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा. सदर यात्रा दोन दिवसाची असून नियोजन पुढीलप्रमाणे- *पहिला दिवस* सकाळी ०६:०० वाजता बस कोपरगाव वरून निघेल.(अहमदनगर-जामखेड मार्गे) १) येरमाळा देवी दर्शन २)तुळजापूर देवी दर्शन ३)अक्कलकोट  मुक्काम *दुसरा दिवस -* ४)गाणगापूर दर्शन ५)पंढरपूर दर्शन ६)शिखर-शिंगणापुर दर्शन ७) जेजुरी गड दर्शन  ८)मोरगाव गणपती दर्शन घेऊन न्हावरा फाटा-अहमदनगर मार्गे कोपरगाव.      *प्रवासी भाडे* प्रौढ  = १६५०/- (आरक्षणासह) जेष्ठ नागरिक= ८३० /- (आरक्षणासह) *बुकिंग व्यवस्था* सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.             *संपर्क* श्री गौतम खरात ९३५९५०६३९६ श्री रामचंद्र शिरोळे  ८३०८९३९५७४ श्री बबन शिंदे ८७८८४७९८३४ श्री उदय रोकडे ९८८१८५६९०६ श्री दिलीप सांबारे ९७६७५११०५३ श्री प्रकाश हिरे ८२७५२६८८९२ * तरी सर्वांनी सदर यात्रेचा

कोपरगाव आगारा च्यावतीने कोकण दर्शन यात्रेचे आयोजन....

Image
  *खुशखबर...  खुशखबर...    खुशखबर...* भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग *कोपरगाव आगारा* च्यावतीने  *दि.  १९/०२/२०२१ शुक्रवार*  रोजी   कोकण  दर्शन  यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसर पाहण्याचा लाभ घ्यावा. सदर यात्रा चार दिवसाची आहे.  कोकण दर्शन पुढीलप्रमाणे -  *कोपरगाव- राजगुरूनगर- कार्ला-एकविरा देवी-महड गणपती-पाली गणपती -मुरुड-जंजिरा-श्रीवर्धन- हरिहरेश्वर (मुक्काम)-परशुराम मंदिर-संगमेश्वर-गणपतीपुळे (मुक्काम)-कॊयनानगर डॅम -सज्जनगड(मुक्काम)- प्रतिबालाजी-नारायणपूर- मोरगाव-शिरूर-अहमदनगर-कोपरगाव* *प्रवासी भाडे* प्रौढ  = २१०५/- जेष्ठ नागरिक= १०५५/- *बुकिंग व्यवस्था* सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.             *संपर्क* *कोपरगाव* श्री गौतम खरात ९३५९५०६३९६ श्री उदय रोकडे ९८८१८५६९०६ श्री प्रकाश हिरे ८२७५२६८८९२ *शिर्डी* श्री रामचंद्र शिरोळे  ८३०८९३९५७४ श्री बबनराव शिंदे ९९२२७९८९५१ श्री दिलीप सांबारे ९७६७५११०५३ श्री गंगाधर लभडे(स्थानकप्रमुख) ९८८१५२१२०४ * तरी सर्वानी सदर यात्

समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप कोयटे याने समुद्रापार कोपरगावचा झेंडा फडकविला

Image
  कोपरगांव-            समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने केयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेत अंतिम स्पर्धकांमध्ये म्हणजे टॉप १० मध्ये स्थान मिळविल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा बर्धन यांनी दिली. या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उप प्राचार्य श्री विलास भागडे म्हणाले कि, ‘केयॉन विझकिड्स हि एक नामांकित जागतिक संस्था असून या संस्थेतर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मागील २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात हि स्पर्धा राष्ट्रीय आंतर शालेय असून विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपले उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतर शालेय ते राष्ट्रीयस्तरांपर्यंत मजल मारावी लागते. या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते. कुलदिप ची स्पर्धा ‘व्यक्तिमत्व स्पर्धा’ (personality contest) या प्रकारात आहे. या प्रकारामध्ये शालेय शिक्षणा बरोबरच अंगभूत असणाऱ्या कला गुणांची दखल घेतली जाते. यामध्ये कुलदीप चे अभिनय कौशल्य

कोपरगाव आगारा च्यावतीने अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन

Image
  खुशखबर    खुशखबर    खुशखबर *संकष्टी चतुर्थी निमित्त* भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग * कोपरगाव आगारा* च्यावतीने *दि. १४/०२/२०२१, रविवारी* *अष्टविनायक दर्शन* यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा. सदर यात्रा दोन दिवसाची असून नियोजन पुढीलप्रमाणे- *पहिला दिवस -* सकाळी ०६:३० वाजता बस कोपरगाव वरून निघेल (संगमनेर मार्गे) १)ओझर गणपती २)लेण्याद्री गणपती ३) महडचा गणपती ४) पाली गणपती ५) आळंदी दर्शन व *मुक्काम* *दुसरा दिवस -* ६)थेऊर गणपती ७)मोरगाव गणपती ८)सिद्धटेक गणपती ९) रांजणगाव गणपती दर्शन घेऊन अहमदनगर मार्गे कोपरगाव      *प्रवासी भाडे* प्रौढ  = १२४५ /- (आरक्षणासह) जेष्ठ नागरिक= ६२५ /- (आरक्षणासह) *बुकिंग व्यवस्था* सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.             *संपर्क* श्री गौतम खरात ९३५९५०६३९६ श्री रामचंद्र शिरोळे  ८३०८९३९५७४ श्री बबन शिंदे ८७८८४७९८३४ श्री उदय रोकडे ९८८१८५६९०६ * तरी सर्वांनी सदर यात्रेचा लाभ घ्यावा. *

जीएसटी कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द होणे बाबत नगर जिल्हा कर सल्लागार असोसिएशन चा निषेध......

Image
  कोपरगाव प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिल कडून वस्तू व सेवा कर कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या जाचक अटी व तरतुदी रद्द व्हाव्यात, जीएसटी कायदा सुटसुटीत व्हावा याकरिता संपूर्ण भारतभर आज दि.२९ जानेवारी रोजी निषेध दिन पाळण्याचे आवाहन वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ने केलेले होते, त्यानुसार *अहमदनगर जिल्हा कर सल्लागार असोसिएशन* ने पुढाकार घेऊन अहमदनगर येथील राज्य विक्रीकर आयुक्त तसेच केंद्रीय विक्रीकर आयुक्त यांचे कार्यालयात एकत्रितपणे कर सल्लागार तसेच व्यापाऱ्याच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले..  जीएसटी कायद्यामध्ये वेळोवेळी व अचानकपणे होत असलेले बदल, व्यापाऱ्यांना सुधारित विवरणपत्रके दाखल करण्यासाठी केलेली मनाई, व्यापारी, करसल्लागार यांना उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईट च्या समस्या, ईनपूट टॅक्स क्रेडिट घेण्यातील अडचणी, थोड्याशा कारणावरून व्यापाऱ्यांच्या नोंदण्या रद्द करणे बाबतची जीएसटी विभागाची हुकूमशाही यामुळे सर्वत्र व्यापारी वर्ग त्रस्त झालेला आहे, व्यापारी वर्गाच्या वतीने कामकाज पहाणारे अनेक कर सल्लागार, सीए रात्रंदिवस केवळ जीएसटी कायद्यात वारं

रस्त्यांची होणारी दुरावस्था : शहर सभेत वाळू वाहतूकीला कडाडून विरोध....... आमदाराला साकडे घालण्याचा शहर सभेत एकमुखी ठराव

  कोपरगाव प्रतिनिधी वाळू उपशासाठी देण्यात आलेल्या ठेक्यांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेत बुधवारी (२७) शहरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता कोपरगाव वाळू लिलाव रद्द करण्यासाठी आमदाराला साकडे घालण्याचा शहर सभेत एकमुखी ठराव करण्यात आला आहे. सर्वानुमते आमदार आशुतोष काळे यांच्याकडे रदबदली करण्याचे हे दायित्व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर सोपविण्यात आले आहे. सभेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाची भुमिका मांडली. वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. नवीन रस्ते करावयाचे आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून रात्रंदिवस सर्रास होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे शहरातील रस्ते खराब झाल्यानंतर वाळू ठेकेदार रस्त्यांसाठी लोकवर्गणी देत नाहीत. भरधाव वेगामुळे गटस आली संभाजी महाराज सर्कलला डंपरने धडक दिली होती. यावेळी मोठी दुर्घटना टळली याच इंदिरा पथ वर पुढे गणेश मंदिर या ठिकाणी सुद्धा डंपर धडकण्याची दुर्घटना घडली होती. याच रस्त्यावर गोकुळ नगरी भागात शहरातून बाहेर पडण्यासाठी शहराचा समांतर असा गोकुळ नगरी पूल बांधण्यात आला आहे या पुलाचे ही नुकसा

कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत काढून केले जाहीर...... कही खुशी कही गम

  कोपरगाव प्रतिनिधी तालुक्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. २८) सकाळी अकराला  ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली. त्यात, तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव   तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. २८) जाहीर झाले. त्यात, २०२० पासून २०२५ पर्यंत  आरक्षण जाहीर झाले.  असे आरक्षण  अनुसुचित जाती (एससी) - (१० गाव), अनुसुचित जमाती -  (११ गाव), नागरिकांचा मागासांचा प्रवर्ग -(२१ गाव), सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडलेली गाव - (३२गाव)  निवडणूक झालेल्या २९ गावाचे  आरक्षण सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण यादी खालील प्रमाणे जाहीर  १ घारी-(सर्वसाधारण),२ कारवाडी  (अनुसूचित जाती),३ बोलकी (सर्वसाधारण),४ चांदेकसारे  (ना.म.प्र.) ५ हिंगणी  (सर्वसाधारण),६ मुर्शतपुर (ना.म.प्र.),७ कान्हेगाव  (अनिसुचीत जमाती) ८ रवंदे  (अनुसुचीत जमाती)  ९ जेऊर कुंभारी (अनुसूचित जमाती),  १० मनेगाव (ना

कोपरगाव मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
  कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यात विविध कार्यक्रमांनी  72 व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार योगेश चंद्रे  यांच्या हस्ते शासकीय झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम येथील तहसीलदार कार्यालय मैदानावर पार पडला.   राष्ट्रगीतानंतर चंद्रे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस पथक, होमगार्ड पथक, एनसीसी पथक, स्काउट गाईड, अग्निशमन दल, आरोग्य पथक,  आरोग्य विभाग यांचा समावेश होता. यानंतर सर्व पथकांनी संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.  कोपरगाव शहर व परिसरातील विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सादर केली.  कर्मवीर शंकरराव काळे कारखाना अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष बिपीन कोल्हे, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कार्याध्यक्ष नितीन दादा कोल्हे, गोदावरी बायो रिफायनरी संचालक एस. मोहन,  गोदावरी दुध संघ अध्यक्ष राजेश  परजणे,  औद्योगिक वसाहत विवेक कोल्हे, कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक नामदेव ठोंबळ, कोपरगाव जिल्हा न्यायालय  न्यायमूर्ती आर. बी. भागवत,   दिवाणी व फौज

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वतीने लावण्यात आलेल्या महत्वाच्या शहरांच्या नावांचे फलक वर्ष-दीड वर्ष पासून गायबच

Image
  कोपरगाव प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या पुणतांबा चौफुली फाट्यावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या चौकट प्रवेशद्वारावर गावाच्या नावाचे फलक गायब झाले आहेत त्याबाबत मात्र संबंधित खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे याबाबतची अधिक माहिती अशी कोपरगाव शहराजवळ नगर-मनमाड महामार्गालगत पुणतांबा चौफुली फाटा असून एक रस्ता आंतरराष्ट्रीय साईबाबांच्या शिर्डी व नगर कडे जातो दुसरा रस्ता झगडे फाटा नाशिक तसेच संगमनेर कडे जातो एक रस्ता सवत्सर वैजापूर औरंगाबाद कडे जातो रस्ता मध्यंतरी अत्यंत खराब झाला होता आता हा रस्ता चांगला झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने लावण्यात आलेले गावाचे किलोमीटर अंतर व नाव असलेले फलक कोणीतरी अज्ञातानी काढून तोडून टाकल्याचे गेल्या वर्ष दीड वर्षापासून दिसत आहे मात्र हजारो गाड्या लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून ये जा करतात तो फलकही पाहतात मात्र त्याबद्दल कोणीही तक्रार आत्ता  पर्यंत  केलेली नाही अथवा  त्याची दुरुस्तीही करण्याची तसदी  संबंधित खात्याने घेतलेली नाही नागपूर वर्धा कारंजा सिंदखेड राजा जालना औरंगाबाद लोणार आधी म

अनाथांच्या आईचा देशपातळीवर गौरव - - - कोल्हे

Image
  हजारो अनाथ मुलामुलींना आपलेसे करून त्यांच्यावर िक्षण संस्काराचे धडे देऊन घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणार्‍या अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले त्यांचा देशपातळीवर गौरव  होत आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हंटले आहे.             त्या पुढे म्हणाल्या की, सिंधुताई सपकाळ यांना आजवर एक हजाराच्या पुढे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.    वर्ध्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी असून आजवर  वय वर्षे 74 पर्यंत त्यांचा पद्मश्री पर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे. त्यांच्या नशिबी हलाखीचं जीणआलं ते अनाथांना येऊ नये म्हणून त्यांची सतत धडपड सुरू असते. त्यांच्या कामाचा केंद्र शासनाने योग्य गौरव केला आहे.  यामुळे महाराष्ट्रवासियांची शान वाढली आहे. पुरंदरच्या कुंभारवळण येथे त्यांनी 1994मध्ये ममता बाल सदन संस्था स्थापन करून या कार्याला आकार दिला.   मदर ग्लोबल फाउडेशनच्या माध्यमातून त्यांची झेप आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे., तर पारधी समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाचा आशेचा किरण दाखवणारे गिरीश प्रभुणे यांनाही केंद्र शासनाने पद्मश्री प

साखरवाडीच्या वैभवाचे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

Image
  कोपरगाव प्रतिनिधी सन 1970 ते 1985 पर्यंतचा तो काळ अतिशय सुवर्णकाळ होता सर्वत्र आबादीआबाद असे वातावरण होते तालुक्यात साखरवाडी करमसी भाई सोमय्या शांतीलाल सोमय्यायांच्या मालकीचा  येथे राज्यातील एक नंबरचा खासगी साखर कारखाना येथे होता या साखर कारखान्यात रेल्वेने ऊस आणला जायचा अगदी भरभराटीचे दिवस होते ते असे येथील खानेसुमारी पाहणारे चाळीस वर्षापासून चे स्वयंपाकी मूळचे राजस्थानचे मिठालाल कुंभार सांगत होते त्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कालखंडातील आठवणींना उजाळा दिला व साखरवाडीच्या असलेल्या भरभराटी बाबत मत व्यक्त केले ते म्हणाले मी 78 साली येथे स्वयंपाकी म्हणून रुजू झालो त्यावेळी रिटायर आर्मी ऑफिसर म्हणून गोपाळ शेट्टी त्यानंतर जनरल मॅनेजर बी एल कपूर जे एन पटेल पी के आर नायर जीएम कजारिया हे  होते आता संचालक एस मोहन आहेत सन 1970 ते 1985 दरम्यान  शिर्डीला साई दर्शनासाठी त्याकाळी येणारे  अनेक मोठमोठे राजकारणी अभिनेते-अभिनेत्री नट्या  अनेक कलाकार साखरवाडी ला  आवर्जून भेट देत असत त्यात प्रामुख्याने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री हरिदेव जोशी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन मनिषा कोईराला डॉक्टर श्रीराम ला