संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा
कोपरगाव प्रतिनिधी
प्रभु येशुनी साऱ्या जगाला शांतता समता बंधुता असा संदेश दिला त्या संदेशातून प्रेरणा घेउन नाताळ सण देश-विदेशात उत्साहात साजरा केला जातो. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलने हा उत्सव यावर्षी अगळ्या वेगळया पध्दतीने साजरा केला. आईवडीलांची निस्सीम सेवा हीच ईश्वर सेवा असून सत्य हे मानवी जीवनाला परिपूर्ण बनविते, त्यामुळे सातत्याने सत्याचा अंगिकार करावा असे प्रतिपादन व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ रेणुका कोल्हे यांनी व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणांचा महत्वाचे स्थान आहे. या प्रत्येक सणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वतीने ते साजरे केले जातात. कोरोना परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांसाठी आॕनलाईन नाताळ सण साजरा केला गेला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. शाळेमध्ये विविध कलाकृतींचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत हा सोहळा साजरा केल्याने आनंद निश्चितच द्विगुणीत झाला, यावेळी त्यांच्या पालकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी सौ कोल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, संजीवनी स्कुल नेहमीच विद्यार्थ्यांच्या बौध्दीक कौशल्याला प्राधान्य देउन विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असते. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असते. आईवडीलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असुन सत्य हे मानवी जीवनाला परिपूर्ण बनविते. त्यामुळे प्रत्येकाने सत्याचा अंगिकार करावा असे सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या. स्कुलचे अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे, यांनी सांताक्लॉज ची वेशभूषा करुन विद्यार्थ्यांना चाॕकलेट, खाऊ वाटप करुन संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांचे सोंबत "जिंगल बेल...जिंगल बेल " गाणे म्हणत नृत्य केले तसेच यावेळी नाटक देखील सादर करण्यात आले. स्कुलचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना नाताळ सणाची माहिती विशद केली . शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे , विश्वस्त बिपीन कोल्हे, विश्वस्त माजी स्नेहलता कोल्हे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याची प्रशांसा करुन मुलांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन कडु मॕडम, घुगरी मॕडम यांनी केले तर आभार प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी मानले .
Comments
Post a Comment