सहकार क्षेत्रात सहकार क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांची ओळख


 कोपरगाव  प्रतिनिधी

सहकार  क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचेकडे आदराने बघितले जाते साखर कारखाना चालवितांना शेतकरी, मजुर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दिनदलितांसह सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारे माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांची ओळख आहे त्यांच्या बरोबरीने काम करण्याची  संधी मला मिळाली, त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो, समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकांसाठी काम करण्याची उर्जा त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.


 मंत्री नामदार रामदास आठवले हे आज कोपरगाव दौ-यावर आले असता त्यांनी सहकार महर्षी  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या वेळी संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समस्या मांडून विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यामध्ये मतदार संघातील दलितवस्ती अंतर्गत रस्ते तसेच समाज मंदिर कामासाठी निधी दयावा, राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विदयाथ्र्यांची कमी केलेली शिष्यवृत्ती वाढवून दयावी, विविध महामंडळाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणा-या कर्जाची मर्यादा वाढवावी, भारतरत्न डाॅ बाबाासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील आंतरराप्ट्रीय स्मारकाचे कामाचा लवकर शुभारंभ करावा, केंद्र सरकारची नविन उदयोग सुरू करण्यासाठी स्ट्रर्टअप योजना ही शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात यावी. पीएमइजीपी या योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील नागरीकांना मिळत असलेल्या कर्जाच्या बाबतीत ज्या काही जाचक अटी सरकारने घालुन दिल्या, त्या शिथिल कराव्यात.अशा विविध मागण्या या निवेदनात केल्या. यावेळी .आठवले  म्हणाले, गेल्या पाच वर्षाच्या काळात सौ कोल्हे यांनी मतदार संघातील जनतेला ख-या अर्थाने न्याय देण्याचे काम केले . कोल्हे यांचा वारसा त्या चालवत असल्याने समाजातील तळागाळातील घटकांसाठी सौ कोल्हे यांचे काम सुरू असल्याचेे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा विकास करून समाजाला न्याय देण्याच्या मिशनमध्ये मला दुस-यांदा संधी मिळाल्याने  समाजात परिवर्तन करण्याच्या कामाला गती आली असल्याचेही .आठवले यांनी आवर्जून नमूद केले.

बिपीन कोल्हे यावेळी म्हणाले, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील घटकांना बरोबर घेउन .आठवले यांनी आपला कतृत्वाचा आलेख उंचावला. महाराष्ट्रातील कानाकोपर-यातील, घरा-झोपडीतील कार्यकर्त्यांना ओळखण्याचे त्यांचे कसब आणि गावखेडयात जाउन समस्यां समजून घेण्याची पध्दत यामुळेच कोणतीही राजकीय पाश्वभूमीवर नसतांना त्यांना उच्च पदावर घेउन गेली. कार्यकर्त्यांना जीवापाड जपणारा माणूस आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकणारा ना. आठवले हे एकमेव नेता असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. त्यांच्या भापणाची आगळी वेगळी शैली प्रत्येकाला भावते त्यामुळेच ते लोकप्रिय आहेत. संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने  बिपीन कोल्हे व सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी सुमित कोल्हे, आरपीआयचे प्रदेश सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्टाचे अध्यक्ष राजाभाउ कापसे, दिपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, कैलास खैरे, सागर जाधव, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, नगरसेवक संजय पवार, शिवाजी खांडेकर, सुशांत खैरे, समीर अंभोरे , रवि रोहमारे, फकीर महमंद पहिलवान, खालीक कुरेशी , दिपक जपे, प्रदीप आहिरे आदीसह भाजपा, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


राजकारणामध्ये ज्यांचे अनेक वेळा घ्यायचो सल्ले, त्यांचे नाव आहे, शंकरराव कोल्हे. हि चारोळी ऐकवून  त्यांनी भाषणाला सुरूवात केली. तर स्वतःच्या लग्नात माजी मंत्री कोल्हे यांनी लाडूचे वाटप केले होते, त्यामुळे त्यांच्यावर असलेले प्रेमही कवितेद्वारे उपस्थितांपुढे व्यक्त केले. माइया लग्नाच्या वेळी कोल्हे यांनी लाडू वाटले, म्हणून त्यांच्या विषयी माइया मनात प्रेम साठले . असे म्हणतात हास्याचे फवारे उडाले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा