सद्य परिस्थितीतील समस्या व उपाय चर्चासत्राचे ऑनलाइन उदघाटन

 कोपरगाव प्रतिनिधी

कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्राध्यापक डॉ. नितीन आर.करमाळकर यांनी चर्चासत्राचे ऑनलाइन उदघाटन केले,  सद्य परिस्थितीतील समस्या व उपाय हा विषय निवडला होता. तसेच अशा परिस्थितीमध्येही शिक्षण व संशोधन चालु राहिले पाहिजे यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याबद्दल माहिती दिली.           
          के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव  तसेच Glocal Environment and Social Association (GESA) न्यु दिल्ली, महर्षी  मार्कंडेश्वर विद्यापीठ हरीयाणा,  के. आर. जी. गर्ग महाविद्यालय मध्यप्रदेश, National Environment Science Academy (NESA) व Asian Biological Research Foundation (ABRF) प्रयागराज, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. २६, २७ व २८ डिसेंबर  रोजी करण्यात आले होते.
          चर्चासत्राचा विषय आताच्या कोरोना महामारीचा सामाजिक, आर्थिक व पर्यावरणावर झालेला परिणाम हा होता. के. जे. सोमैया महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले. 
          द्वितीय सत्रामध्ये Asian Biological Research Foundation  प्रयागराज (उत्तरप्रदेश) यांच्या वतीने के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांना त्यांनी शैक्षणिक जीवनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तृतीय सत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनपर पेपरचे वाचन करण्यात आले. 
          चर्चासत्राचे आभार  डॉ. नितीन शिंदे  यांनी केले. 
          ऑनलाइन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजनासाठी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोक रोहमारे  सचिव  ऍड.  संजीव कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. के. जे. सोमैया महाविद्यालय   सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा