धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!
आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे. नाशिक जिल्ह्यात या धनगरी घोंगडीला "जिन" म्हणतात असे पुसटसे आठवतेय!
सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ…!
गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!
धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-
पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .
हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.
घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.
अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: 🕉️☮️
पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता.
घोंगडीचा वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोल मध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते. श्री गुरुलीलामृत, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती इ. तसच इतर सर्व साधना आणि मंत्रांचा अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करु शकता.
वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे.
घोंगडी घरपोच कशी मागवाल?
ReplyDelete100% ओरिजिनल आणि सर्वोत्तम क्वालिटीच्या टिकाऊ घोंगड्या मिळवण्यासाठी आजच वेबसाईटला भेट द्या अथवा खाली दिलेल्या नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॅटलॉग मागवून घ्या.
www.ghongadi.com
फोनवर बूक करण्यासाठी, निरज बोराटे संस्थापक घोंगडी.कॉम 📞 9765566888
This comment has been removed by the author.
ReplyDeleteअस्सल हातमागावरील जवळच्या घोंगडी Online Order करण्यासाठी आजच भेट द्या. https://ahilyabaiholkar.in/shop/ghongadi/ Or Call on 8999143074
ReplyDelete