“पंचतत्वा” नुसार होणार पर्यावरणाचे संवर्धन
पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच त्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान
हाती घेतले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार कोपरगाव नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान
अंमलबजावणी सुरुवात केली असून पृथ्वी, वायु, जल, अग्नि, आकाश या पंचतत्वाचा आधारे शहरात हे
अभियान राबविले जाणार आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे संतुलन
राखणे तितकेच गरजेचे आहे. या उद्देशाने राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान हाती घेतले आहे. राज्यातील
स्थानिक स्वराज्य संस्था तसेच निवडक गावे व शहर यामध्ये सदर अभियानाला सुरुवात झाली असून
कोपरगाव नगरपरिषदेने देखील पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या अभियानामध्ये पृथ्वी
वायु जल अग्नी आकाश या पंचतंत्राच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. महात्मा
गांधी यांच्या जयंती दि.०२ ऑक्टोबर २०२० पासून हे अभियान राज्यात सुरू झाले आहे.
पृथ्वी तत्वानुसार शहरातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि जमिनीचे
धुपीकरण कमी करणे हे कामे केली जाणार आहे. तर जल तत्वानुसार नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे,
जलस्त्रोतांचे रक्षण व संवर्धन आणि नदी किनाऱ्याची स्वच्छता तसेच सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार आहे.
वायू तत्वानुसार हवेतील प्रर्दुषणाचे मोजमाप, धूळ कमी करणेकामी रस्त्याच्या बाजूला हरिती करण करणे,
नागरी भागात नॉन मोटारईज वाहतुकीस प्रोत्साहन देणे. अग्नि तत्त्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे
त्याचा अपव्यय टाळून ऊर्जा बचत करणे अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे.
आकाश तत्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपातील मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार
आहे.
यासाठी शहरभर जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रचार-प्रसार केली जाणार आहे.
माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या नगरपरिषदांचा शासनाकडून
गौरव केला जाणार आहे. सदर
अभियानामध्ये पृथ्वी ६००, जल ४००,
अग्नी १००, वायू १०० आणि आकाश ३००
असे गुण देण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने सुरू केलेले माझी वसुंधरा
अभियान पालिकेकडून प्रभावीपणे
राबविले जाईल. पर्यावरण संवर्धनासाठी
नागरिकांनी देखील नगरपरिषदेला
सहकार्य करावे. वृक्ष लागवड व त्यांचे
जतन, नदी स्वच्छता, घरातील कचरा
वर्गीकरण करून देणे याबाबतीत सर्वच
नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले.
विजय वहाडणे, प्रशांत सरोदे,
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,
कोपरगाव नगरपरिषद. कोपरगाव नगरपरिषद.
Comments
Post a Comment