नवीन वर्षात पांढरे धान्य महागेल मनुष्याला पीडा राहील
कोपरगाव प्रतिनिधी
आगामी वर्षात पांढरे धान्य महागल पौष महिन्यात गारपिट होईल मृग महिन्यात पाऊस पडल पिवळ्या धान्याला कमी प्रमाणात पांढऱ्या धान्याला धोका राहील मनुष्याला अचानक पिडा उद्भवल कोरोना रोगाचा धोका अजून पाच ते सात महिने राहील असे होइक भोजडे येथील गवंजी राम मंचरे भगत यांनी कोपरगाव शहरात बिरोबाचे मंदिर चौकात वरील भविष्य वर्तवले आहे या कार्यक्रम प्रसंगी शिवनाथ भगत रखमाजी कभगत बाबासाहेब भगत भाऊसाहेब भगत विठ्ठल मैदड कांतीलाल मैदड यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होतेकोपरगाव प्रतिनिधी
शहरातील गावठाण भागात जागृत व ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची चंपाषष्ठी निमित्त 19 डिसेंबर रोजी यात्रा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आल्याची माहिती कांतीलाल मैंदड विठ्ठल मैंदड राजेंद्र मैंदड यांनी दिली. शहरातील जुन्या गावठाण भागात बिरोबा चौक येथे असलेल्या या मंदिरात जवळपास 300 वर्षे होऊन गेली असून त्याची स्थापना सन १६०१ मध्ये करण्यात आली. या मंदिराचा 99 वर्षांपूर्वी 1920 साली जीर्णोद्धार करण्यात आला होता. प्राचीन परंपरा असलेल्या या देवस्थानाची देखभाल धनगर समाज भगत मंडळी करतात. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रा अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आली. वीरभद्र मुर्तीस जितेश गोडसे संतोष मैंदड देविदास पगारे यांनी सपत्नीक अभ्यंगस्नान महामस्तकाभिषेक धार्मिक पूजा विधि, ग्राम पुरोहित शशांक सातभाई यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच सामाजिक अंतर राखत बाहेरगावाहून आलेली तालुक्यातील भोजडे येथील मोजक्याच भगत मंडळींची एकच कर्ण महाल काठी चे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. बिरोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजावट करण्यात आली होती यात्रा यशस्वीतेसाठी दत्तात्रय मैंदड किरणमैंदड रामदास आदमने यांचेसह समाज प्रतिनिधी कार्यकर्ते आदींनी सहभाग नोंदवला महाप्रसाद म्हणून बुंदीचे पाकिटे वाटण्यात आली.
Comments
Post a Comment