चांदेकसारे रस्त्या वर होणार नव्याने श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाची स्थापना भूमिपूजन 31 डिसेंबर रोजी होणार- डॉक्टर यशराज महानुभाव


 कोपरगाव प्रतिनिधी

 तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात चांदेकसारे रस्त्या नजीक आता 66 गुंठे जागेत श्रीकृष्ण मंदिराचे भव्य निर्माण व महानुभाव आश्रमाची निर्मिती केली जाणार आहे त्या जागेचे भूमिपूजन 31 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत   संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती आश्रमाचे संस्थापक संचालक व्यवस्थापक डॉक्टर यशराज महानुभाव यांनी दिली या कार्यक्रम प्रसंगी पंचकेश्वर राक्षसभुवन जिल्हा बीड येथील महंत दरिया पुरकर बाबा महानुभाव भोकर तालुका श्रीरामपूर येथील महंत  गुमफेकर बाबा महानुभाव महंत श्री गोमे राज बाबा महानुभाव संवत्सर येथील महंत श्री राजधर बाबा महानुभाव कनाशी तासगाव येथील महंत  खामनी कर बाबा बाबा महानुभाव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत भूमिपूजन प्रवचन व महाप्रसाद वाटप केले जाणार आहे सोळा वर्षापुर्वी नगर-मनमाड रस्त्यावर सुमारे चार कोटी रुपये खर्चून श्रीकृष्ण मंदिर व आश्रमाची निर्मिती व उभारणी करण्यात आली होती मात्र  व समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्याने व  त्या भागात मोठे सर्कल होणार असून मंदिर व आश्रमाचा काही भाग त्यात जाणार असल्याकारणाने  आता हे मंदिर चांदेकसारे रस्त्या नजीक सहासष्ट गुंठे जागेत उभारण्याचा मानस डॉक्टर यशराज महानुभाव यांनी व्यक्त केला व त्या कामास सुरुवातही  झाली आहे  सरपंच सुभाष आव्हाड यांच्या सहकार्याने ही जागा या आश्रमासाठी मिळाली आहे संदीप महानुभव  व्यवस्थापक म्हणून तेथील काम पहात आहे कोपरगाव तालुक्याचा परिसर पुण्यभूमी म्हणून पवित्र आहे गोदावरी नदी किनारी अनेक देवस्थाने आहे मंदिर उभारणीमुळे तालुक्याच्या वैभवात भरच पडणार आहे मंदिर उभारणीच्या कामासाठी नागरिकांनी विविध रूपाने मदत करावी असे आवाहनही डॉक्टर यशराज महानुभव यांनी केले आहे भूमिपूजन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा