कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम असणारे व्यक्तिमत्व : विश्वासराव आरोटे
ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्यांचा गेली दशकभर सातत्याने पाठपुरावा करुन त्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले व्यक्तिमत्व म्हणजे संघाचे विद्यमान सरचिटणीस विश्वासराव आरोटे होय. चितळवेढे (ता.अकोले, जि.अहमदनगर) या छोट्याशा गावी जन्म. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन मिळेल ते काम करत गेले. अनेक अडचणी आल्या. पतसंस्थेत शिपाई पदावर काम केले. दूध विक्री केली. याचवेळी वर्तमानपत्र विक्रीचेही काम सुरु केले. हे काम करत असतानाच पत्रकारीतेची ओळख झाली. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत वृत्तपत्र पोहचवायचे असेल तर त्या वृत्तपत्रात ग्रामीण भागातील समस्या मांडण्याच्या हेतूने लेखन सुरु केले. या समस्या मांडत असतानाही अनेक अडचणी आल्या. राजकीय अथवा स्वहिताला प्राधान्य न देता लेखन सुरु ठेवले. येथून सुरु झालेली ही बातमीदारी त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली. वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी ‘दैनिक गांवकरी’ या उत्तर महारा