नाशिकच्या ओम महाजनचे संजीवनी युवा प्रतिष्ठान कडून अभिनंदन


कोपरगाव (प्रतिनिधी) : 
नाशिकच्या सतरा वर्षे ओम महाजन याने अत्यंत कमी वेळेत काश्मीर ते कन्याकुमारी हे 3800 किलोमीटरचे अंतर सायकल द्वारे पार करुन आकाशाला गवसणी घातली असून त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे, त्याबद्दल त्यांचे संजीवनी यूवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोपरगाव तालुका औद्योगीकचे अध्यक्ष विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.  त्याची ही कामगिरी क रोना योद्ध्यांना निश्चितच स्फूर्ती नायक आहे.

 श्री. विवेक कोल्हे पुढे देवी म्हणाले की, सध्या लॉंकडाऊन कोरो ना सदृश्य परिस्थिती आहे.   शाळा महाविद्यालय सुरू नाही, त्यामुळे मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात, त्याही परिस्थितीत नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजन या तरुणाने अतुलनीय कामगिरी करत सायकल द्वारे आठ दिवस 7 तास 38 मिनिटात 3800 किलोमीटर अंतर पार करत काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास कमी वेळेत स्वतःच्या नावे नोंदवीला आहे. त्याच्या कामगिरीचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. सर्वजण दिवाळीचे अभ्यंगस्नान करत असताना या पठ्ठ्याने 13 नोव्हेंबर रोजी ही मोहिम हाती घेत पूर्ण केली, त्याच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे ही विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा