वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड कर्मचाऱ्याला मारहाण
कोपरगाव प्रतिनिधी: वीज वितरण कंपनीने वाढीव वीज बिल माफ करावे या मागणी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेत कोपरगाव शहरातील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयात घुसून कार्यालयात तोडफोड केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी मनसेच्या पाच जणांविरूद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
कोपरगाव वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे संतोष कांतीलाल गंगवाल, सुनील जनार्दन फंड, अनिल शिवाजीराव गायकवाड, रोहित बाळासाहेब एरंडे, योगेश नेमीचंद गंगवाल या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या वाढीव बिल माफ व्हावे प्रकरणी या मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत गुरुवारी (२६) रोजी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. भगवंत शंकर खराटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे.
कोपरगाव शहरामध्ये मनसेचे दोन गट आहेत. पैकी वाढीव वीज बिलासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, याबाबत मनसे शहरप्रमुख सतीश काकडे यांच्या गटाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गुरुवार (२६) रोजीची डेडलाईन दिली होती. व आपण आंदोलन करणार असल्याची पूर्वसूचना पोलीस स्टेशन लढाई दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. ठरल्याप्रमाणे शहर अध्यक्ष काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात येऊन रीतसर आंदोलन केले होते. व वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी दिलेल्या शब्दानंतर ते काकडे आंदोलन मागे घेऊन तेथून निघून गेले होते. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता मनसेच्या दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी बेकायदा मंडळी जमवून कार्यालयात आले होते.कार्यालयात घुसून केबिनच्या काचा फोडल्या व खुर्च्यांची तोडफोड केली उपस्थित यज्ञेश महेंद्र शेलार रा. ओमनगर या कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले . याप्रकरणी मनसेच्या दुसरा गटाच्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे पो.स.ई भरत नागरे हे पुढील तपास करीत आहे.
Comments
Post a Comment