ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या साठी व एक दिवसाचा देशव्यापी संप


 कोपरगाव प्रतिनिधी

तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांचा विविध  मागण्यासाठी एक दिवस देशव्यापी संप करण्यात आला  त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सरकारी कामाचा दर्जा मिळावा , तीन पदोन्नती मिळाव्यात, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी यासारख्या विविध प्रकारच्या मागण्या मान्य कराव्यात अशा मागण्या करीत देशाचे संघटनेचे सेक्रेटरी एस एस महादेवय्या व श्रीरामपूर विभागाचे नेते निवृत्ती जाधव, बाळासाहेब गोडगे यांचे मार्गदर्शनाखाली हा संप पुकारण्यात आला होता कोपरगाव तालुक्यातील सर्वग्रामीण टपाल कार्यालयासमोर जमून सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन हा संप शंभर टक्के यशस्वी केला यावेळी ज्ञानदेव पगारे दत्तात्रय गायकवाड राहुल आढाव दादाभाऊ साबळे,  मच्छिंद्र आव्हाड, हौशीराम भिंगारे, प्रियांका फले अंकिता अग्निहोत्री आदी कर्मचारी उपस्थित होते, प्रास्तविक संवत्सर चे दत्तात्रय गायकवाड यांनी केले तसेच ज्ञानदेव पगारे यांनी मागण्या मान्य न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .  आभार राहुल आढाव व दादाभाऊ साबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा