साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष , कंट्रोल रुम सुविधा २४ तास सुरु


शिर्डी -

दिनांक १६ नोव्‍हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर साईभक्‍तांना शिर्डीची वारी व श्रीं चे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष (Helpline), कंट्रोल रुम (Control Room) व WhatsApp ही सुविधा कायमस्‍वरुपी २४ तास सुरु करण्‍यात आलेली आहे.

सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते. दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त श्रीं च्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापुर्वी व आल्‍यानंतर निवासभोजनवैद्यकीय सेवा व दर्शनाची परिपुर्ण माहिती सहज व सुलभरित्‍या मिळावी. तसेच त्‍यांची फसवणुक होऊ नये या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने हेल्‍पलाईन कक्षकंट्रोल रुमची निर्मीती करण्‍यात आलेली आहे. हे कक्ष साईभक्‍तांकरीता कायमस्‍वरुपी २४ तास उपलब्‍ध असणार आहे.

याकरीता श्री साईबाबा संस्‍थानचे हेल्‍पलाईन मोबाईल नंबर +९१७५८८३७४४६९ / +९१७५८८३७३१८९ / +९१७५८८३७५२०४कंट्रोल रुम मोबाईल नंबर  +९१७५८८३७१२४५ / +९१७५८८३७२२५४ व WhatsApp नंबर +९१९४०३८२५३१४ हे क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत. तरी साईभक्‍तांनी अधिक माहिती करीता या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थाशिर्डीच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा