देवीच्या मंदिराचे कळसाचे कामास सुरुवात उक्कडगाव च्या रेणुका माता मंदिरा ला भाविकांनी भरीव मदत करा आवाहन
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर गेल्या सात-आठ वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिराचे काम संथ गतीने सुरू आहे मंदिराचे काम सुमारे चार कोटी रुपये खर्चाचे आहे देवी मातेच्या कृपेने मंदिराचे काम भाविक भक्तांच्या गावकऱ्यांच्या व विविध नेत्यांच्या खासदार आमदारांच्या सहकार्याने तसेच देश-विदेशातील राज्यातील परराज्यातील देवी भक्त आत्तापर्यंत दिलेल्या मदतीतून स्टील खडी सिमेंट वाळू व रोख स्वरूपात दिलेल्या रकमेतून काम प्रगतीपथावर आहे ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते व नवसपूर्ती पावते अशी ख्याती आहे या मंदिराची शनिवार दिनांक 28 पासून कामास सुरुवात करण्यात आली त्याचे पूजन वैजापूर येथील शिवभक्त दत्त गिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रेय खेमनर मंदिर बांधकाम करणारे आर्किटेक्ट मोहित गंगवाल अध्यक्ष अशोक शिंदे उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे विश्वस्त देविदास शिंदे सोपान शिंदे लक्ष्मण शिंदे नंदू शिंदे रेवन निकम विधिज्ञ दिलीप जोशी नबाब भाई मिस्तरी यांचे सह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते कोरोना महामारीमुळे तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव झाला नाही, वरुणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते आता सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले आहे त्यामुळे भाविक भक्तांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे शासन नियम पाळून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे भाविकांनी सोशल डिस्टन्स पळून दर्शन घ्यावे असे आवाहन रेणुकादेवी झाला देवस्थान व उक्कडगाव ग्रामस्थांनी केले आहे मंदिराचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी मंदिराच्या बांधकामासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने स्टील सिमेंट वाळू व इतर साहित्य देणगी म्हणून द्यावे म्हणजे हातभार लागून काम तातडीने पूर्णत्वाकडे जाईल त्यासाठी भाविकांनी मदत करावी असे आवाहन विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती नंदू शिंदे यांनी दिली
Comments
Post a Comment