संविधान दिनाच्या निमित्ताने श्रमिकराज बांधकाम कामगार संघटनेच्या फलकाचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांच्या हस्ते अनावरण संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार नोंदणी अभियान फलकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय सूर्यवंशी होते.
यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले श्रमिकराज कामगार संघटनेच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी अभियान सुरू केले जाणार असून यामध्ये कष्टकरी व असंघटित कामगारांना याचा फायदा होणार आहे. मी इंजिनिअर असून इमारत बांधकाम कामगारांचे जवळून कष्ट बघितले आहे. त्यामुळे शासनाकडून यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्रमिकराज कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामध्ये कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात आपले नाव नोंदवावे . संघटनेला काही अडचण आल्यास त्यावेळी आपण संघटनेबरोबर खंबीरपणे उभे राहू र अशी ग्वाही मंगेश पाटील यांनी दिली.
पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गेल्या दहा वर्षापासून जे कोपरगावातील अतिक्रमण उठलेले असून त्यामध्ये काही लोकांनी कोपरगाव सोडून निघून गेले तर काहीचा प्रपंच उघड्यावर पडला काहींनी आत्महत्या केल्या असे असताना दि.४सप्टेंबर रोजी श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने व मी स्वतः नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे विस्थापितांना लवकरात लवकर खोका शॉप बांधून देण्याचे मान्य केले. श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय विघे व त्यांचे सहकारी यांनी सतत पाठपुरावा केला आहे. कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने उत्तम पुणे काम चालू असल्याचे पाटील यांनी सांगितले .
यावेळी बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष भिक्खू आनंद सुमन सिरी, भिक्खू कश्यप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव दिपकराव गायकवाड , अँड. नितीन पोळ, अँड. सुरेश मोकळ, विश्वकर्मा समाजाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय विघे, उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, रंभाजी रणशुर, सचिव गणेश पवार, कोषाध्यक्ष कुणाल झाल्टे, संघटक विलास गवळी ,माजी नगरसेवक अरविंद विघे, नगरसेवक हाजी मोहम्मद भाई सय्यद,शंकर घोडेराव, राहुल धिवर, सौ.सुनीता पवार, सौ. सविता साळवे ,सौ. सविता वाघ बुद्धिष्ट यंग फोर्स चे अध्यक्ष विजय त्रिभुवन, राजेंद्र उशिरे ,मनोज शिंदे, कैलास साळवे, नितीन शिंदे, प्रबुद्ध भातणकर अभिजित वाघ मिलिंद विघे, अनिरुद्ध विघे,कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीचे अकबर भाई शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विजय भातनकर यांनी सूत्रसंचालन तर आभार राजेंद्र पगारे यांनी मानले.
Comments
Post a Comment