साईंचे चरणी ३ कोटींची देणगी
०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त
शिर्डी -
राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईभक्तांकडून विविध प्रकारे ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
सध्या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्यात आलेले होते. राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून दिनांक १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे ६१ लाख ०४ हजार ६०० रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच या कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे ८० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.
तसेच दिनांक १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत रोख स्वरुपात एकूण ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये इतकी देणगी प्राप्त झालेली आहे. यामध्ये दक्षिणापेटी मोजणी रुपये ०१ कोटी ५२ लाख ५७ हजार १०२, देणगी काऊंटर ३३ लाख ०६ हजार ६३२ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये ०१ कोटी २२ लाख ५० हजार ८२२ रुपये व ०६ देशांचे परकिय चलन अंदाजे रुपये ०१ लाख ६८ हजार ५९२ यांचा समावेश आहे. तर ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झालेली आहे.
Comments
Post a Comment