पोहेगाव नागरी पतसंस्थेतर्फे रेमडीसेवर लसी साठी एक लाख अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत...
कोपरगाव प्रतिनिधी
तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते रुग्ण कल्याण समितीकडे धनादेश सुपुर्द
कोपरगाव प्रतिनिधी शिवसेनानेते नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने covid-19 ने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी
रेडमीसेवर लस उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण कल्याण समितीला तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांच्याकडे एक लाख अकरा हजार रूपयेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
नगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या पतसंस्था चळवळीत नागरी पतसंस्थेने आपली वेगळी ओळख
निर्माण केली आहे. सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये नेहमी सहभाग घेऊन समाजसेवेचे व्रत या पतसंस्थेने अंगीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोपरगाव तालुक्यातीलही गेल्या आठ दिवसात एक्टीव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व प्रशासन रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे. मात्र covid-19 च्या रेडमिसेवर लसीची उपलब्धता रुग्णांच्या प्रमाणात नसल्याने कोरोना बाधित रुग्णांना लस उपलब्ध होताना अडचणी निर्माण होत आहे. रुग्णांच्या प्रमाणात या लसी ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध नाही. लस घेताना आर्थिक निधीची कमतरता सध्या भासत आहे. दुसरी लाट आल्यास मोठा धोका संभवू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी संचालक मंडळांची बैठक घेत रुग्ण कल्याण समितीला आर्थिक साहाय्य करण्याची सूचना केली मग संचालक मंडळाने तातडीने रुग्ण कल्याण समितीला एक लाख अकरा हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. काल तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे धनादेशही सुपूर्त केला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर, डॉ नितीन बडदे,पोहेगांव पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, उपाध्यक्ष विलास रत्ने ,जिल्हा स्थैर्यनिधीचे संचालक रमेश झांबरे ,व्यवस्थापक रमेश हेगडमळ अदी उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यात विविध सामाजिक संघटना, सहकारी संस्थेने कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. रेमडीसेवर लसीचा आर्थिक निधी मुळे तुटवडा निर्माण झाला आहे. या लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी रुग्ण कल्याण समितीला आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहनही नितिनराव औताडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment