निसर्गाची रम्य छटा
स्वच्छंद बागडणारी मोर लांडोर...... विविध पक्षी ....गुलाबी सर्द हवा... पहाटे पहाटे पडणारे दाट धुके .....अशा वातावरणात फिरण्याचा आनंद घेताहेत नागरिक
यावर्षी झालेल्या पावसामुळे सर्वत्र शेत जमीन हिरवाईने वनराई नटली गेली आहे निसर्गाचा अनोखा अविष्कार नागरिकांना पाहायला मिळत आहे गोड गुलाबी थंडीचा आस्वाद घेत अनेक नागरिक तरुण तरुणी स्त्रिया सकाळी फिरण्याचा चालण्याचा सायकलवरून फिरण्याचा आनंद घेत आहेत सर्वत्र हिरवे गालिचे गवत फुल झाडी फुलली असून त्याचा मोर लांडोर मुंगूस प्राणी पक्षी बगळे स्वच्छंद पणे बागडताना दिसत आहे दूरवरून हे दृश्य निश्चितच पाहणाऱ्याला सुखावणारे असते काहीजण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे द्रुष्य टिपताना दिसताहेत अधून मधून पडणारे धुके उन पळणारे पांढरेशुभ्र ढग हे दृश्य मनाला भावणारे वाटते सध्या गोदावरी नदी तुडुंब भरलेली आहे तसेच साखर कारखान्यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या बंधारा कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांच्या मालिकांमुळे बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले आहेत पिके पाण्याची स्थिती बरी आहे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे सर्वत्र डिंक लाडू बनवण्याची महिलावर्गात लगबग सुरू आहे सुक्या मेव्याची दुकाने शहरात मोठ्या प्रमाणावर थाटली आहे
Comments
Post a Comment