नगराध्यक्ष वहाडणे यांनी दुटप्पी धोरण ठेवून विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नये - उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे


कोपरगाव प्रतिनिधी

शहरातील गेल्या 10 वर्षापासुन प्रलंबित राहिलेल्या विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी  व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या अं आंदोलनाला अपेक्षीत नसतांना शहरातील विस्थापितांसह, सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे नगराध्यक्षांची विस्थापितांच्या प्रश्नावर मोठी कोंडी झाल्याने विस्थापितांमध्ये संभ्रम निर्माण करुन दुटप्पी धोरण डोळयासमोर ठेवुन  विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नये अशी टीका  उपनगरध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी  केली आहे. 
पत्रकातून त्यांनी म्हटले की शहरातील आरोग्य, पाणी, रस्ता यासह कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणतेही राजकारण, विरोध न करता सभागृहातील सर्व विषयांना सहमती देवुन विषय मंजुर केले. विस्थापितांच्या प्रश्नावर सभागृहात नगराध्यक्षांनी षडयंत्र करुन विस्थापितांच्या विषयात  अडथळे आणले परंतु नगरसेवकांनी ते अडथळे बाजुला करुन विस्थापितांच्या प्रश्नाला मंजुरी दिली ठराव मंजूर केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले नगराध्यक्षच जनतेचे राहिलेले नाही, जनतेचे प्रश्न मार्गी न लागता जनतेची कशापध्दतीने दिशाभुल करता येईल यातच नगराध्यक्ष कायम व्यस्त राहतात  अशी टिका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी शेवटी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा