26 नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात जि.प.कर्मचारी महासंघ सहभागी होणार
अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी पुकारलेल्या 26 नोव्हेंबर रोजीच्या लाक्षणिक संपात जिल्हा परिषद कर्मचारी संवर्ग सहभागी होणार आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन दिले. अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी वर्गात अन्यायाची भावना आहे. त्याला वाट करून देण्यासाठी लाक्षणिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे व जिल्हा सरचिटणीस मंगेश पुंड यांनी दिली.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे, जिल्हा सरचिटणीस मंगेश पुंड, विभागीय संघटक बाळासाहेब आंबरे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावसे, राज्य कौन्सिलर सुरेश मंडलिक, परिचर संघटनेचे अध्यक्ष अशोक काळापहाड, नर्सेस संघटनेच्या मंदा माने, पशुवैद्यकीय संघटनेचे डॉ.साळुंके, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघाच्या मनिषा शिंदे, मीना कालेकर, रमेश बांगर, सागर आगरकर, निलेश गाडेकर आदींच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment