अबब...11 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्णांची संख्या त्यातून पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितीत तब्बल अकरा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली त्यातून एक नंबर कांद्याला साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले कोरोणाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून त्यातून रुग्णांची संख्या देखील वाढत आहे .राज्यात काही ठिकाणी लॉक डाऊन करण्यात आले असून आपलेही तालुक्यात व परिसरात पुन्हा लॉक डाऊन होते की काय या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कांदा बाजार समिती आणला, त्यातच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसचे वातावरण निर्माण झाले आहे तर काही ठिकाणी हलकासा पाऊस देखील झाला आहे कांदा चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्री कडे मानसिकता झाली आहे .त्यातूनच आज कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांची वाहने कांदा विक्रीसाठी आली होती .त्यातून एकच गर्दी उडाली बाजार समिती आवारात जागा न आल्याने अखेर जनावरांच्या बाजाराच्या मैदानावर गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या .कोपरगाव येथील बाजार समितीत तब्बल सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून एक नंबर कांद्यास चार ते साडेचार हजार ,दोन नंबर कांद्याचे 3 हजार ते तीन हजार 900 रुपये ,तीन नंबर कांद्यास 1000 ते 2900 रुपये इतका भाव मिळाला.
दरम्यान शिरसगाव तिळवणी येथील उपबाजार समितीत 500 वाहनातून पाच हजार क्विंटल कांदा आवक झाली एक नंबर कांद्याला 3800 ते 4000 दोन नंबर कांद्याला 3100 ते 3750 तीन नंबर कांद्याला 1000 ते 2600 इतका भाव मिळाला असल्याची माहिती रक्ताटे व सचिव नानासाहेब रनशूर यांनी दिली .दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यानंतर पुन्हा कांदा भरून आणून लिलाव वाट उभे केल्याने नंबरला उभे असलेल्या वाहनांचा चालकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता
Comments
Post a Comment